Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. (mumbai local train)

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले
Mumbai Rains
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 11:27 AM

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर 20 मिनिटे उशिराने लोकल धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. (Suburban Services on Central Main Line Hit Due to Incessant Rainfall)

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला झोडपले. रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे ते नाहूर स्टेनश दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं. संपूर्ण रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरून रेल्वे धीम्यागतीने सुरू होती. तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. पाऊस, लोकलचा खोळंबा आणि त्यामुळे झालेली गर्दी यामुळे चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अडचणींना सामोरे जावं लागल्याने चाकरमानी वैतागले होते.

हार्बर, पश्चिम रेल्वेवर परिणाम नाही

विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचलं होतं. त्यामुळे 20 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. फक्त मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

वाहतूक कोंडी

दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्येही पाणी साचलं आहे. मुंबईतील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

कांदिवलीत बापलेक पाण्यात पडले

दुसरीकडे, जोरदार पावसामुळे मुंबईतील कांदिवली भागातही पोटरीभर पाणी साचलं होतं. कांदिवली वाहतूक चौकीसमोर एक व्यक्ती साचलेल्या पाण्यातून आपल्या लहान मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहातून चालताना फुटपाथला अडखळून तो पडला. यावेळी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोलीस राजेंद्र शेगर यांनी तत्परता दाखवली आणि ते त्याच्या मदतीला धावून गेले. हा पिता आपल्या मुलीला सुखरुप प्रवाहातून बाहेर काढून जाईपर्यंत त्यांनी सोबत केली आणि बापलेकीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. (Suburban Services on Central Main Line Hit Due to Incessant Rainfall)

संबंधित बातम्या:

पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका

VIDEO | मुंबईत साचलेल्या पाण्यातून चालताना बापलेक अडखळून पडले, पोलिसाची मदत

एक फोन आला, बापाची नजर हटली, तीन मुलं वाहून गेली, ‘लुशी’चं काय झालं? सांगली हादरली

(Suburban Services on Central Main Line Hit Due to Incessant Rainfall)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.