एसटी कर्मचारी आक्रमक, बेमुदत उपोषणाचा इशारा, दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा निर्णय

प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

एसटी कर्मचारी आक्रमक, बेमुदत उपोषणाचा इशारा, दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा निर्णय
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 8:14 AM

कोल्हापूर: प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पगारवाढ, महागाई भत्ता वाढवून मिळावा

27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु होणार आहे. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

एसटीचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करा

दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेववर वेतन दिलं जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना एच आर वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढं असतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी एक कृती समिती सर्व संघटनांनी मिळून स्थापन केलेली आहे.

तीन टप्प्यात आंदोलन

समितीच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणं तीन टप्प्यात आंदोलन करण्याच निश्चित करण्यात आलं आहे. दिवाळी तोंडावर आलेली त्या पार्श्वभूमीवर आम्ही 27 ऑक्टोबरपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय एसटीचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचं एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

राज्य सरकारच्या भूमिकेकडं लक्ष

एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. राज्य सरकार आणि  परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेणार का हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या

Weather Forecast : परतीचा पाऊस 26 ऑक्टोबरपासून पुन्हा बरसणार, शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

अंबरनाथ एमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा, सापाला पाहून कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण, पुढे काय झालं?

Maharashtra ST workers gave warning of agitation for various demands

Non Stop LIVE Update
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.