पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातली मायनस मते येत्या निवडणुकीत प्लस होण्यासाठी प्रयत्न करा; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 4:29 PM

मागच्या निवडणुकीत पाथर्डी - शेवगाव विधानसभेत मायनस झालेली मते येणाऱ्या निवडणुकीत प्लस कशी होतील यासाठी प्रयत्न करा, असे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातली मायनस मते येत्या निवडणुकीत प्लस होण्यासाठी प्रयत्न करा; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जयंत पाटील
Follow us

अहमदनगर : मागच्या निवडणुकीत पाथर्डी – शेवगाव विधानसभेत पराभव झाला तरी आपल्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली हे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे मायनस झालेली मते येणाऱ्या निवडणुकीत प्लस कशी होतील यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाथर्डी येथे केले. (Minus votes in Pathardi-Shevgaon constituency make it plus in upcoming elections, Jayant Patil’s appeal)

येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीची संख्या वाढवायची असेल तर गणित सुधारले पाहिजे आणि गणित सुधारले तर येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला लढाई करायची असेल तर सैन्य तयार पाहिजे, बुथ कमिट्या तयार करून त्यादृष्टीने प्रयत्न करा, असेही जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, भगवानगडाच्या पाण्याच्या प्रश्नावर मुंबईत आढावा बैठक घेईन, असा शब्द यावेळी पाटील यांनी नागरिकांना दिला.

लवकरच स्वतंत्रपणे भगवानबाबांच्या दर्शनासाठी येईन : पाटील

काही वर्षांपूर्वी पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले होते, तेव्हा भगवानगडाला ‘ब’ गटाचा दर्जा मिळवून दिला होता. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भगवानबाबाची सेवा झाली, याचे मला समाधान वाटते. या गडावर जाऊन भगवानबाबांचं दर्शन घ्यावं, अशी इच्छा होती, मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा ते शक्य झाले नाही. मी लवकरच स्वतंत्रपणे भगवानबाबांच्या दर्शनासाठी येईन, असेही पाटील यावेळी म्हणाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊ

पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. काही दिवसांपासून मराठवाडयाला अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. सरकारच्या वतीने पंचनामे तात्काळ सुरू करण्यात आले आहेत. लवकरच सरकार शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पाथर्डीत

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा सातवा दिवस असून अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी – शेवगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, क्षितिज घुले, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ॲड. प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगांव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, युवक जिल्हाध्यक्ष संजय कोळगे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या

मुंबईत एमबीबीएसच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; दोन डोसनंतरही संसर्ग झाल्याने टेन्शन वाढले

ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरू; मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती: विजय वडेट्टीवार

औरंगाबादकरांनो.. पोलिसांच्या मदतीसाठी आता डायल करा 112 हेल्पलाइन क्रमांक, 5 मिनिटात मिळेल मदत

(Minus votes in Pathardi-Shevgaon constituency make it plus in upcoming elections, Jayant Patil’s appeal)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI