ईदची नमाज घरातूनच अदा करत प्रशासनाला सहकार्य, ‘कोरोना लवकर जाऊ दे’, सांगलीतल्या मुस्लिम बांधवांची प्रार्थना

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मुस्लिम समाजाने घरीच नमाज पठण केल्याने ईदगाह मैदानावर कसलीही गर्दी पाहायला मिळाली नाही.

ईदची नमाज घरातूनच अदा करत प्रशासनाला सहकार्य, 'कोरोना लवकर जाऊ दे', सांगलीतल्या मुस्लिम बांधवांची प्रार्थना
सांगलीतील मुस्लिम बांधवांनी नियम आणि अटी पाळून ईद साधेपणाने साजरी केली...

सांगली :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मुस्लिम समाजाने घरीच नमाज पठण केल्याने ईदगाह मैदानावर कसलीही गर्दी पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साधेपणाने मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली. यावेळी ईदची नमाज घरातच अदा करून कोरोनापासून लवकरात लवकर मुक्ती मिळावी अशी प्रार्थना मुस्लिम समाज बांधवांनी केली.

बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज अदा करण्यावर कोरोना संकटामुळे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज नमाज अदा केली. सार्वजनिक ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव येण्याची शक्यता गृहीत धरुन ईदगाह मैदानावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु कमिटीकडून फक्त पाचच समाज बांधवांना नमाज अदा करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार बांधवांनी शासनाने घालून दिलेले नियम आणि अटी पाळून प्रशासनाला सहकार्य केलं.

काय आहे बकरी ईदचा इतिहास?

इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचं महत्त्व आहे. बकरी ईद साजरी करण्यापाठीमागे एक इतिहास आहे.

हजरत इब्राहिम अलैहि सलाम हे अल्लाहचे सेवक मानले जातात त्यांना… ज्यांना इस्लामचे अनुयायी अल्लाहाचा दर्जा देतात. याच दिवशी त्यांच्या सांगण्यावरून हजरत इब्राहिम यांना पुत्र हजरत इस्माईलची कुर्बानी देण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा हजरत इब्राहिम यांनी मुलाच्या प्रति असलेलं प्रेम कुर्बान देताना आड येऊ नये म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधली होती. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी डोळ्यावरची पट्टी हटवली तर त्यांना त्यांचा मुलगा सुरक्षित दिसला. अल्लाने चमत्कार केला आणि मुलाच्या जागी बकरा कुर्बानी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हापासून कुर्बानी देण्याची ही प्रथा सुरु झाली.

(Muslim Community Bakari Eid Celebrated Simply in Sangal