मटण खाल्यानंतर २७ जणांना विषबाधा, त्या रात्री नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यात मटणातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. मटण खाल्याने सहसा विषबाधा होत नाही. पण, त्या रात्री असं काही घडलं ज्यातून ही विषबाधा झाला.

मटण खाल्यानंतर २७ जणांना विषबाधा, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 2:52 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यात मटणातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. मटण खाल्याने सहसा विषबाधा होत नाही. पण, त्या रात्री असं काही घडलं ज्यातून ही विषबाधा झाला. कंदुरीसाठी आणलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवली होते. मात्र वादळी वाऱ्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे अन्नाची नासाडी होऊन विषबाधा झाल्याचे सांगण्यात आलय. जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वानोळा तांडा इथे कंदुरीचे मांसाहारी जेवण केल्यानंतर 27 जणांना विषबाधा झालीय. यात सात बालकांचाही समावेश आहे. विषबाधा ग्रस्त सर्व रुग्णांना किनवट इथल्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलय.

माहूर तालुक्यातील वानोळातांडा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात मटण खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली. बुधवारी २७ जणांना ही बाधा झाली. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली.

NANDED 2 N

हे सुद्धा वाचा

यांना दाखल करावे लागले रुग्णालयात

वानोळातांडा येथे 3 मे रोजी कंदुरीचा कार्यक्रम होता. मटण फ्रिजमध्ये आणून ठेवले होते. रात्रीला विजेची समस्या कायम असल्याने फ्रीज बंद पडले होते. हे मटण खाल्ल्याने दत्ताराम राठोड (वय ४०), बळीराम राठोड (वय ६५), नितीन राठोड (वय ३०), विलास पवार (वय ४७), संगीता राठोड (वय ३४), नम्रता राठोड (वय २६), सृष्टी पवार (वय ११), हरीश राठोड (वय १०), क्रिश राठोड (वय ५), त्रिशा राठोड (वय ३), अनिल राठोड (वय ४५) यांना विषबाधा झाली.

याशिवाय संतोष चव्हाण (वय ४५) सोनू राठोड (वय २५), क्रांती राठोड (वय २०), ललिता राठोड (वय ३०), प्रांजल राठोड (वय ४), विजय राठोड (वय ४०), कोमल राठोड (वय ६०), रामराव राठोड (वय ३५), शिवपाल राठोड (वय ३६), नमिबाई जाधव (वय ६०), भारती पवार (वय १८), रंजना राठोड (वय ३५), चंद्रकला राठोड (वय ३०), जागेश्वर आडे (वय ५२), अर्जुन चव्हाण (वय ५०), प्रेमीलाबाई आडे सर्व रा. वानोळातांडा अशा २७ जणांना विषबाधा झाली आहे.

फ्रीज बंद पडला अन् पदार्थ झाले विषबाधित

कंदुरीच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवशी रात्रीच पदार्थ आणून फ्रीजमध्ये ठेवले होते. मात्र रात्रभर गावात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे परिसरातील लाईट बंद होती. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ निकामी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.