Nandurbar | प्रशासनाला कधी येणार जाग…? चरणमाळ घाटात आठ दिवसात तीन अपघात, कांद्याने भरलेला ट्रक पलटी, दोन जण जखमी

चरणमाळ घाटात लुटमारीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना केल्या. स्थानिक पोलीस अधिकारी बाळासाहेब भापकर यांनी चरणमाळ परिसरातील ग्रामस्थांची बैठका घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करून लूट थांबवली असली तरी अपघात थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Nandurbar | प्रशासनाला कधी येणार जाग...? चरणमाळ घाटात आठ दिवसात तीन अपघात, कांद्याने भरलेला ट्रक पलटी, दोन जण जखमी
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 12:58 PM

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात सलग दुसऱ्या दिवशी अपघात (Accident) झाल्याची घटना घडलीयं. चरणमाळ घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कांद्याने भरलेला ट्रक सटाण्याहून गुजरातकडे जात असताना चरणमाळ घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसलीतरी चालक आणि सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत. काल मालेगाव (Injured) सुरत बसचा याचठिकाणी अपघात झाला होता. या अपघातामध्ये वीस प्रवासांना किरकोळ दुखापत झाली होती आणि आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ट्रक (Truck) घाटात कोसळला आहे. आठवडाभरात हा तिसरा अपघात आहे. मात्र महामार्ग प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलतांना दिसत नाहीयं.

सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येणार जाग?

चरणमाळ घाटात दररोज होणाऱ्या अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुठली उपाययोजना करताना दिसून येत नाहीये. जणू काय मृत्यू तांडवाची वाट पाहत आहेत. या घाटात वर्षानुवर्ष अपघात आहेत तर महाराष्ट्र आणि गुजरात होऊन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहन ये-जा करतात. मात्र या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने कुठलाही दिशादर्शक फलक लावला नाहीयं. इतकेच नाही तर पुलांवर कठाळे देखील लावण्यात आले नाहीयं, यामुळे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे.

हे सुद्धा वाचा

लुटमार थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केला उपायोजना

चरणमाळ घाटात लुटमारीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना केल्या. स्थानिक पोलीस अधिकारी बाळासाहेब भापकर यांनी चरणमाळ परिसरातील ग्रामस्थांची बैठका घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करून लूट थांबवली असली तरी अपघात थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.

सूचना फलक घाटामध्ये लावण्याची मागणी

या ठिकाणी अपघात होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण तीव्र उतार आणि लागलीच मोठे वळण असल्याने नवीन चालकाला घाटाची कल्पना येत नाही आणि अपघात होतात. याठिकाणी घाटाच्या उतारावर एका बाजूला गतिरोधक बसवावे त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित होईल. 40 पेक्षा कमी वेगानेच वाहन घाटात चालवण्याबाबत देखील सूचना फलक लावाले आणि अपघात क्षेत्राचा फलक घाटात लावावेत. अशी मागणी आता जोर धरू लागलीयं.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.