AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमध्ये पावसाची दांडी, शेतकरी संकटात; प्रशासन ॲक्शन मोडवर, रोहयोतून रोजगार देण्याचा निर्णय

पावसाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात उत्तर महाराष्ट्रात पावसानं दडी मारली होती. ऑगस्ट महिन्यातही हीच परिस्थिती कायम असल्यानं शेतकरी अडचणीत सापडेलत. नंदुरबार जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे.

नंदुरबारमध्ये पावसाची दांडी, शेतकरी संकटात; प्रशासन ॲक्शन मोडवर, रोहयोतून रोजगार देण्याचा निर्णय
शेतकऱ्याचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 5:06 PM
Share

नंदूरबार: पावसाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात उत्तर महाराष्ट्रात पावसानं दडी मारली होती. ऑगस्ट महिन्यातही हीच परिस्थिती कायम असल्यानं शेतकरी अडचणीत सापडेलत. नंदुरबार जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात होवून समोर दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही असूनही अद्याप मुसळधार पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. यामुळे नादिनाल्यांसाह विहीर,कूपनलिका अद्याप कोरड्याच पडले असल्याने जिल्हा प्रशासन आता शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

दुबार पेरणीची पिकंही धोक्यात

जिल्ह्यात दोन महिने उलटूनही पावसाअभावी दुबार पेरणी केलेली पिकेही धोक्यात आले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. जून जुलै महिना संपला ऑगस्ट महिना सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहे. तरी, देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे प्रशासन देखील आता आराखडा तयार करता आहे.

जिल्ह्यात 40 टक्केचा जवळ पास पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाने 6 तालुक्‍यांच्या आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाला जिल्ह्याची परिस्थिती कळवली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक वाचविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून नरेगा मधून रोजगार दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी सांगितलं आहे.

नागरिक उकाड्यानं हैराण

नंदूरबार जिल्ह्यातील नागरिक श्रावण महिन्यात ऑक्टोबर महिन्यासारखा हीटचा अनुभव जिल्ह्यात घेत आहेत. जिल्ह्यात तापमानाचा पारा चार अंशांनी वाढून 35 ते 36 अंशवर पोहोचला आहे. बाष्पयुक्त हवेमुळे पिकांवरही परिणाम होत असून सर्वत्र पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. श्रावणात पावसाच्या सरीचा अनुभव येतो मात्र नागरिक कडक उन्हाचां अनुभव नागरिक घेत आहे. गेल्या दोन दिवसापासून तापमान वाढ झाली असून सरासरी 31 32 अंश असणाऱ्या तापमान 35.6 अंशापर्यंत गेले त्यामुळे उकाड्याने हैराण केले आहे.

पिकं वाचवण्याचं आव्हान

वातावरणात बाष्पयुक्त हवा सुरू असल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्याचा परिणाम पिकावर होऊ लागला आहे. सध्या स्थिती काही शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी पेरणी केली आहे, त्यामुळे अशा पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात 16 ऑगस्ट नंतर पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.त्या बरोबर जिल्ह्यात पिण्याचा पाणीची देखील भीषणता भासणार आहे असं आता तरी वाटत आहे.

इतर बातम्या:

Onion Price Today: जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, कांद्याचा आजचा दर किती?

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

Nandurbar district recorded very low rain during this season District Administration started plan for implement MNREGA

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.