चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब … तू टेन्शनमध्ये पाठवलंस, आंघोळ करता करता थांबलो: नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल देसाई ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. जेव्हा ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, तेव्हा देसाईच नव्हे तर खुद्द केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही घालमेल झाली.

चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब ... तू टेन्शनमध्ये पाठवलंस, आंघोळ करता करता थांबलो: नारायण राणे
narayan rane
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:23 PM

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल देसाई ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. जेव्हा ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, तेव्हा देसाईच नव्हे तर खुद्द केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही घालमेल झाली. खुद्द राणेंनीच त्यांची घालमेल कशी झाली हे सांगितलं. निकाल लागत असताना तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं होतं. आंघोळ करता करता मी थांबलो होतो, असं सांगत नारायण राणे यांनी मनमुराद हसून तणावाला वाट मोकळी करून दिली.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे मुंबईत होते. जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झाल्याची बातमी येताच राणे सिंधुदुर्गाच्या दिशेने गेले. त्यांनी सिंधुदुर्गात येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यावेळी ईश्वर चिठ्ठीने निवडून आलेले विठ्ठल देसाईही बाजूलाच बसलेले होते. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी लढत झाली होती. यावेळी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल देण्यात आला. त्यात विठ्ठल देसाई विजयी झाले होते.

राणे नेमकं काय म्हणाले?

तुम्ही (विठ्ठल देसाई) जिंकला खरं वाटतंय… नशीब आहे हां… नशीब आहे… मोठ्ठं नशीब आहे… चिठ्ठीवर येणं म्हणजे मोठ्ठं नशीब. तुम्ही आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं. मी आंघोळ करता करता थांबलो… म्हटलं अरे काय ते…, असं राणे म्हणाले. तेव्हा एकच खसखस पिकली. स्वत: राणेंनीही हा किस्सा सांगताना मनमुराद हसून दाद दिली.

मविआच्या लोकांना जागा दाखवली

यावेळी त्यांनी राजन तेलींच्या पराभवावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अजितदादांना टोला

ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते. नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चाललं. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. कुणाविरोधात? अतिरेक्यांविरोधात? अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात याला अक्कल म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप

Sindhudurg Bank Election Result | आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी

Narayan Rane: आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार, सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचं सूचक विधान

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.