Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप

ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही काँग्रेस आणि भाजपची भूमिका आहे असे महादेव जानकर म्हणाले आहेत. काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ओबीसी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार असा इशाराही जानकरांनी दिला आहे.

Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप
mahadev jankar
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:58 PM

पुणे : राज्यात सध्या नगरपंचायती आणि महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असताना ओबीसी आरक्षणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आधी भाजपच्या साथीने चालणारे रासप नेते महादेव जानकर आता महाविकास आघाडी सरकारचे कौतुक करू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे जानकरांनी भाजप आणि काँग्रेसवर ओबीसी आरक्षणावरून निशाणाही साधला आहे, तसेच त्यांनी स्वबळाचा नाराही दिला आहे. महादेव जानकरांनी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका आणखी चुरशीच्या होणार आहेत.

काँग्रेस आणि भाजपला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही

ओबीसी आरक्षणावरून महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर थेट आरोप केला आहे. ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही काँग्रेस आणि भाजपची भूमिका आहे असे महादेव जानकर म्हणाले आहेत. काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ओबीसी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार असा इशाराही जानकरांनी दिला आहे. सुरूवातीला धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलून धरणारे महादेव आता ओबीसी आरक्षणावरूनही आक्रमक झालेत, काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी असल्याचे म्हटले होते, त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

कोरोना काळात राज्य सरकारचं काम चांगलं

भाजप सरकारच्या काळात मंत्री राहिलेल्या जानकरांनी महाविकास आघाडीचे कौतुक केल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महादेव जानकरांनी कोरोना काळात राज्य सरकारचं काम चांगलं आहे, असे वक्तव्य केल्याने जानकर महाविकास आघाडीबरोबर जाण्याच्या तयारीत आहेत का? असे अनेक तर्क वितर्क सुरू झाले आहेत. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र महादेव जानकरांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपचे थोडेफार तरी नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच पंकजा मुंडे माझी बहिण आहे, ज्या दिवशी त्यांच्यावर अन्याय होईल त्या दिवशी त्या मला सांगितील, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांच्याबाबतीत महादेव जानकरांनी दिली आहे.

Police woman Suicided | पुण्यात पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

हे काय? तीन हात, तीन पायांचं बाळ! बिहारमध्ये विचित्र स्थिती, सोनोग्राफीलाही चकवा!

अवकाळी, गारपिटीने सर्वाधिक नुकसान विदर्भाचे, भरपाईच्या अनुशंगाने प्रशासनाचे काय आहे नियोजन?

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.