कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 7:34 AM

पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.

Vitthal Rukmini Mandir

Vitthal Rukmini Mandir

कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय, लसीचा दूसरा डोस घेतला पाहिजे – अजित पवार

यावेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत म्हटले, “18-20 महिने मंदिर बंद होती. वारीत खंड पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही मला म्हणायचे हे पुर्वरत व्हायला पाहिजे. मात्र कोरोना कमी होत नव्हता. मात्र, यंदा प्रशासनाला चांगली साथ दिली. सगळ्यांनी एकत्रित ठरवून यात्रा केली. आता मंदिरंही सुरु झाली आहेत. महापूजेमध्येही मी सहभागी झालो. पण, महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. युरोपात जास्त पेशंट मिळायला लागलेत. लसीचा दूसरा डोस घेतला पाहिजे. लोक पहिला घेतात आणि दूसरा घेण्याची गरज नाही म्हणतात. डब्ल्यूएचओनं सांगितलंय बुस्टर डोसची गरज नाही.मुख्यमंत्री आणि प्रशासन यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय”

Vitthal Rukmini Mandir

Vitthal Rukmini Mandir

“महाराष्ट्रात अशा दंगली व्हायला नकोत. पोलिसांनी व्यवस्थित नियंत्रणात आणलंय. सोशल मीडियात काहीतरी अफवा करण्याचं काम होता कामा नये. पक्षीय राजकारण न आणता सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे.”

तुटेपर्यंत ताणू नये, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

एसटीच्या संपाबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “देशापातळीवरील एअर इंडिया एवढ्या काम करत होती. ती कंपनी खाजगी केली आणि विकली. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. एसटीची परंपरा 60 वर्षांची आहे, अनेक सरकार आली मात्र अशी मागणी कोणी केली नाही. महामंडळ ते त्याचं काम करत होतं, राज्य सरकारने 1 हजार आणि 500 कोटीची मदत केली. आम्हाला हे पाहिजेच अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली नाही पाहिजे. त्यांनी दोन पावलं पुढे मागे घेऊन चाललं पाहिजे. आत्महत्या करण्यापर्यंतचा विचार स्पर्श करता कामा नये. प्रवाशांचाही विचार करावा लागतो, कर्मचाऱ्यांचाही विचार करावा लागतो, महागाई वाढतीये त्याचा फटका हा सर्वसामान्यांन बसतोय. तुटेपर्यंत ताणू नये. मुख्यमंत्र्याचं ऑपरेशन झालंय त्यांना विश्नांती घ्यायला सांगितलीये. अनिल परब आणि आमचे सहकारी सहकार्य करतायेत, पवार साहेबही प्रयत्नात आहे असं दिसतंय.”

आपण काय बोलतोय त्याबद्दल काहीतरी भान ठेवलं पाहिजे, अजित पवारांची विक्रम गोखलेंवर टीका

“बाबासाहेबांनी मत मांडण्याचा अधिकार दिलाय, अधिकार देत असताना आपण काय बोलतोय त्याबद्दल काहीतरी भान ठेवलं पाहिजे. अनेकांनी स्वतः च्या पर्वा न करता बलिदान दिलंय. अनेकजण अशी वक्तव्य करतायेत की, लोकशाहीत दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करतात, का अशी भावना काहींच्या मनात आहे.”

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृह फुलांनी बहरला

Vitthal Rukmini Mandir

Vitthal Rukmini Mandir

आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडु , शेवंती ,कार्नेशियन ,गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असुन हि सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जामभुळकर यानी केली आहे ..श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलासह विविध आकर्षक पाना फुलानि सजवण्यात आला आहे तसेच सोळखांबी , सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे

संबंधित बातम्या :

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.