वीज कोसळली अन् सगळं नेस्तनाबूत, तब्बल 100 मेंढ्यांचा जागीच मृत्यू, आम्ही जगावं तरी कसं ? मेंढपाळांचा प्रश्न

वीज कोसळून तब्बल शंभर मेंढ्या तसेच दहा बकऱ्या जगीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील सावली येथे हा प्रकार घडला. सावली हा दुर्गम भाग आहे.

वीज कोसळली अन् सगळं नेस्तनाबूत, तब्बल 100 मेंढ्यांचा जागीच मृत्यू, आम्ही जगावं तरी कसं ? मेंढपाळांचा प्रश्न
GADCHIROLI

गडचिरोली : वीज कोसळून तब्बल शंभर मेंढ्या तसेच दहा बकऱ्या जगीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील सावली येथे हा प्रकार घडला. सावली हा दुर्गम भाग आहे. येथे राजस्थान तसेच गुजरात येथून दरवर्षी मेंढपाळ येतात. मृत्यू झालेल्या मेंढ्या याच मेंढपाळांच्या आहेत. (One hundred sheep and ten goats have been killed in a lightning strike in gadchiroli district)

तब्बल 100 मेंढ्यांचा मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील सावली येथे काही दिवसापासून राजस्थान तसेच गुरजारतचे मेंढपाळ मुक्कामी होते. त्यांनी सोबत बऱ्याच मेंढ्या आणल्या होत्या. सावली हा भाग दुर्गम आणि जंगलाचा असल्यामुळे हे मेंढपाळ येथेच राहतात. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून काही भागात मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. पावसादरम्यान वीज कोसळल्यामुळे ही घटना घडली. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे तंबूमध्ये असलेल्या तब्बल शंभर मेंढ्या व दहा बकऱ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी

दरवर्षी हे मेंढपाऴ गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मेंढ्याना घेऊन येत असतात. परंतु यावेळी मेंढपाळांनी जंगलातच आपला निवारा तयार केला होता. याच घनदाट जंगलात मेघगर्जना होऊन वीज कोसळली आणि त्यांचे पशूधन नेस्तनाबूत झाले. लाखोंचे नुकसान झाल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी मेंढपाळ करत आहेत.

नागपुरात दोन खेळाडूंच्या आंगावर वीज कोसळली, जागीच मत्यू 

नागपुरातील खापरखेडा येथील चनकापूरमध्ये अशीच एक भीषण घटना घडली. येथे नियमित सरावासाठी मैदानावर आलेल्या खेळाडूंवर वीज कोसळल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या खेळाडूंमध्ये एक धावपटू तर दुसरा फुटबॉलपटू आहे. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे मृतांचे शरीर पूर्णपणे भाजले. यातच त्यांचा मृत्यू झाला. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह अशी मृतांची नावे आहेत.

इतर बातम्या :

काल शरद पवारांनी सुनावलं आज रजनी पाटलांनी, राहुल गांधींना तोंडावर काँग्रेसची कमजोरी सांगितली

आता त्यांना ‘तुमचा भुजबळ करू’ असं म्हणता येणार नाही; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला

Ganesh Chaturthi 2021 | पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये जमावबंदी, मिरवणूक काढण्यास मज्जाव

(One hundred sheep and ten goats have been killed in a lightning strike in gadchiroli district)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI