हिंगोलीतील पहिलीच ग्रामपंचायत, PFMS प्रणालीने डिजीटल पेमेंट, ही सिस्टम नेमकी काय?

PFMS या प्रणालीद्वारे संयुक्त लॉग इनमधून हिंगोली तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायतीने डिजिटल पेमेंट करण्याचा प्रथम बहुमान मिळवला आहे. (PFMS system Digital payment hingoli Balsond Grampanchayat)

हिंगोलीतील पहिलीच ग्रामपंचायत, PFMS प्रणालीने डिजीटल पेमेंट, ही सिस्टम नेमकी काय?
PFMS या प्रणालीद्वारे संयुक्त लॉग इनमधून हिंगोली तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायतीने डिजिटल पेमेंट करण्याचा प्रथम बहुमान मिळवला आहे.
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 9:50 AM

हिंगोलीहिंगोली जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायती पैकी 15 व्या वित्त आयोगाच्या PFMS या प्रणालीद्वारे ग्रामसेवक आणि सरपंच (मेकर आणि चेकर) यांच्या लॉगइनमधून हिंगोली तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायतीने डिजीटल पेमेंट करण्याचा प्रथम बहुमान मिळवला आहे. जिल्ह्यातील ही डिजीटल पेमेंट करणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. (PFMS system Digital payment hingoli Balsond Grampanchayat)

डिजीटल पेमेंट करण्याची ही सिस्टम काय आहे…?

केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोग या हेडखाली राज्यातल्या 27 हजार ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधी वर्ग केलाय. हे सरपंच आणि ग्रामसेवक यांचं संयुक्त खातं आहे. केंद्र सरकारने याच्यामध्ये कोणतेही मध्यस्ती न ठेवता थेट निधी खर्च खर्च करण्याचे आदेश सरपंच आणि ग्रामसेवकांना दिलेले आहेत. पूर्वी केंद्र सरकारचा निधी खर्च करण्यासाठी चेक पेमेंटची प्रणाली वापरण्यात येत होती. मात्र 2020-2021 पासून अधिक पारदर्शकता येण्यासाठी केंद्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय लागू केलाय.

सरपंच आणि ग्रामसेवकाची महत्त्वाची भूमिका

यामध्ये सरपंच चेकरची भूमिका निभावणार आहे तर ग्रामसेवक मेकरची भूमिका निभावणार आहे. आता हे चेकर आणि मेकर म्हणजे काय तर एखाद्या वेंडरला ज्यावेळी त्याने केलेल्या कामाचं पेमेंट करायचं असेल, त्यावेळी मेकरने अॅप्रवुल द्यायचं आणि चेकरने चेक करायचं, अशी भूमिका सरपंच आणि ग्रामसेवकांना निभवावी लागणार आहे.

डिजीटल स्वाक्षरी करण्याचं बंधनकारक

परंतु असं पेमेंट घेण्यासाठी किंवा देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींला (सरपंच आणि ग्रामसेवक) डिजीटल स्वाक्षरी करण्याचं बंधनकारक केलंय. ही डिजीटल साईन 15 व्या आयोगाच्या बँकेच्या खात्याला (चेकर आणि मेकर संयुक्त खाते) लिंक केल आहे. त्यामुळे आता पेमेंट करणं अगदी काही मिनिटांमध्ये शक्य होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतींपैकी 15 व्या वित्त आयोगाच्या PFMS या प्रणालीद्वारे संयुक्त लॉग इनमधून हिंगोली तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायतीने डिजिटल पेमेंट करण्याचा प्रथम बहुमान मिळवला आहे. 9 तारखेला हे पेमेंट करण्यात आलंय. बळसोंडच्या शैलेश जयस्वाल यांनी यासाठी चेकरची (सरपंच) भूमिका निभावली तर राज किलचे यांनी मेकरची (ग्रामसेवक) भूमिकी निभावली.

(PFMS system Digital payment hingoli Balsond Grampanchayat)

हे ही वाचा :

Hingoli Accident | चौघा शिक्षकांच्या मृत्यूला कारणीभूत, हिंगोलीतील ‘त्या’ ठेकेदाराविरोधात गुन्हा

Aurangabad | औरंगाबादमध्ये शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.