औरंगाबादेत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा, कुटुंबावर शोककळा

शहरालगत असणाऱ्या वाळूज महानगरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने एका तरुणाला चिरडले आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की, यामध्ये तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

औरंगाबादेत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा, कुटुंबावर शोककळा
AURANGABAD ACCIDENT


औरंगाबाद : वाळूज महानगरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने एका तरुणाला चिरडले आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की, यामध्ये तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय. वाळूज महानगरातील कामगार चौकात ही घटना घडली असून शेख फेरोज असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. (young man died in accident who crushed by truck Waluj Aurangabad Mahanagar)

तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा 

मिळालेल्या माहितीनुसार 14 जून रोजी हा अपघात घडला. एक दुचाकी तसेच ट्रकचा हा अपघात आहे. यामध्ये ज्या ट्रकखाली मृत तरुण आला तो ट्रक भरधाव वेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. ट्रकचा वेग जास्त असल्यामुळेच दुचाकीवरील तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात तरुण दुचाकी चालक ट्रकखाली आल्यामुळे त्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. एवढेच नाही तर ट्रकने या मृत तरुणाला तब्बल 25 फूट फरफटत नेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अपघात झाल्यानंतरचा व्हिडीओ तसेच मृत तरुणाचे फोटो सोशल मीडियावर दिवसभर फिरत होते.

शेख फेरोजच्या कुटुंबीयांवर शोककळा

दरम्यान, या दुर्घटनेत तरुण ज्या दुचाकीवर चालला होता ती दुचाकीसुद्धा फुटली आहे. दुचाकीची परिस्थिती पाहून या अपघाताची तीव्रता काय असावी याबाबत अंदाज बांधला जाऊ शकतोय. घरातील तरुण आणि कमावता मुगला गमावल्यामुळे शेख फेरोजच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. हा अपघात ज्या लोकांनी प्रत्यक्षपणे पाहिला आहे तेही हळहळ व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

हिंगोलीमध्ये विचित्र अपघात, चार जणांचा मृत्यू

हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. सध्या हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही असेच काम सुरु होते. त्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. त्यामुळे कार खड्ड्यात पडल्यानंतर गाडी लगेच लॉक झाली. त्यानंतर पाण्यात बुडून गाडीतील चारही जणांचा मृत्यू झाला.

रविवारी रात्री हा प्रकार घडला. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे कार वेगाने जाऊन खड्ड्यात आदळली. यानंतर गाडीतील चौघांनाही सावरण्यासाठी वेळही मिळाला नाही. खड्डा पाण्याने भरला असल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन चौघांचाही मृत्यू झाला.

इतर बातम्या :

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

सांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय?

लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

(young man died in accident who crushed by truck Waluj Mahanagar Aurangabad )