शेतकरी कन्येची पर्यावरण संवर्धनासाठी 11 महिन्यांपासून सायकल भ्रमंती, 14 हजार किमीचा प्रवास!

वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे ही शेतकऱ्यांची कन्या 11 महिन्यापासून सायकलवरून राज्यभरात पर्यावरण व महिला सबलीकरण विषयासंदर्भात जनजागृतीसाठी फिरत आहे.

शेतकरी कन्येची पर्यावरण संवर्धनासाठी 11 महिन्यांपासून सायकल भ्रमंती, 14 हजार किमीचा प्रवास!
प्रणाली चिकटे

पंढरपूर : वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे ही शेतकऱ्यांची कन्या 11 महिन्यापासून सायकलवरून राज्यभरात पर्यावरण व महिला सबलीकरण विषयासंदर्भात जनजागृतीसाठी फिरत आहे. पंढरपूर येथे आल्यानंतर प्रणाली चिकटे हिचा सत्कार सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.

11 महिन्यांपासून सायकल भ्रमंती

आजपर्यंत पर्यावरणविषयक सायकल वरून प्रवास करत पुरुषांना संदेश देताना पाहिले आहे. प्रणालीला कोरोना महामारीमुळे मानवी समाजावर झालेले दुष्परिणाम दिसून आले. त्यातूनच महाराष्ट्र भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. तिने 11 महिन्याच्या प्रवासात नागरिकांना दिवसेंदिवस वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात याचा संदेश दिला आहे.

 पर्यावरण संवर्धन आणि महिला सबलीकरणासाठी जनजागृती

11 महिन्यांमध्ये प्रणालीने पर्यावरण विषयक संदेश देत 14 हजार किलोमीटरचा प्रवास केला. हा संदेश देत राज्याच्या कानाकोपऱ्यांत जाण्यासाठी तिचा मानस आहे. त्याचबरोबर महिला सबलीकरणावर भर दिला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी

वाढते इंधन प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी जवळ फिराला जात असताना सायकलचा वापर करावा. यातून नागरिकांची शरीर तंदुरुस्त राहते यातून पेट्रोलची बचत होऊन इंधन प्रदूषणही रोखण्यात मदत होते. राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे असल्याची प्रणालीने यावेळी सांगितले.

वणीच्या प्रणालीचं सर्वत्र कौतुक

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील प्रणाली चिकटे राहते. पर्यावरण संवर्धनासाठी ही 21 वर्षाची प्रणाली महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास करत जनजागृती करते आहे. राज्यातील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती, महिला सशक्तीकरणाचा जागर करत प्रणालीने सायकल भ्रमंतीचा निर्धार केला. प्रणाली राज्यभरातील सायकल भ्रमंतीसाठी गेले अनेक दिवस प्रवास करतीय.

(pranali Chikte travel All mahharashtra For Environmental Conservation)

हे ही वाचा :

पर्यावरण संवर्धनासाठी 21 वर्षीय तरुणीची भ्रमंती, सायकलवरुन महाराष्ट्रभर प्रवास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI