AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई रेणुकेचा माहूर गड सज्ज,  गुरुवारी पहाटे पाच वाजेपासून प्रवेश, भाविकांची ने-आण करण्यासाठी 80 बसेस

माहूर (नांदेड): साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर (Mahur, nanded) येथील रेणूका मातेच्या नवरात्रोत्सवाची  (Navrateri Festival)जय्यत तयारी सुरु आहे. या उत्सवानिमित्त तहसील कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. येत्या 07 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून दोन वर्षानंतर गडावर यात्रा भरणार असल्याने प्रशासनाकडूनही (Nanded District Administration) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी […]

आई रेणुकेचा माहूर गड सज्ज,  गुरुवारी पहाटे पाच वाजेपासून प्रवेश, भाविकांची ने-आण करण्यासाठी 80 बसेस
दोन वर्षांनंतर भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 1:47 PM
Share

माहूर (नांदेड): साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर (Mahur, nanded) येथील रेणूका मातेच्या नवरात्रोत्सवाची  (Navrateri Festival)जय्यत तयारी सुरु आहे. या उत्सवानिमित्त तहसील कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. येत्या 07 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून दोन वर्षानंतर गडावर यात्रा भरणार असल्याने प्रशासनाकडूनही (Nanded District Administration) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

घटस्थापनेपासून भाविकांना मंदिरात प्रवेश

येत्या 07 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवसापासून भाविकांना पहाटे पाच वाजेपासूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मंदिरात प्रवेशासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारचे पास दिले जाणार नाहीत, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी दिली. भाविकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत गडावर देवीच्या दर्शनासाठी येण्याचे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

गडावरील दुकानांवर मास्क, सॅनिटायझर उपलब्ध

माहूर गडावर येणाऱ्या भाविकांसाठी दुकानांवर मास्क, सॅनिटायझर आदी उत्पादने उपलब्ध असतील. तसेच मंदिर परिसरात सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहानही करण्यात आले आहे.

भाविकांची ने-आण करण्यासाठी 80 बसेस

रेणूकामातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गडावर ने-आण करण्यासाठी 80 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पोलीस अधिकारी 15 आणि 185 पुरुष पोलीस, 65 महिला पोलीस, शहर वाहतूक शाखेचे 40 कर्मचारी आणि पुरुष होमगार्ड 200, महिला होमगार्ड 100 असावेत, अशी मागणी पोलिस विभागाकडे करण्यात आली आहे. नगरपालिकेकडून स्वच्छता, कंट्रोल रुम, फिरते शौचालय, पिण्याचे पाणी, धूर फवारणी, पार्किंग व्यवस्था आदी सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली.

नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही कडक नियमावली

नाशिक जिल्ह्यात नवरात्रोत्सावची मोठ्या उत्साहात तयारी सुरू झाली आहे. या काळात वणीचे सप्तश्रृंगी मंदिरही खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. नवरात्रच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर बातम्या- 

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

Shardiya Navratri 2021 : दुर्गा माता केवळ सिंहावरच आरुढ का होते, जाणून घ्या पौराणिक कथा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.