पूरग्रस्तांच्या मदतीवरुन अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची शेकापकडून मागणी, नेमकं प्रकरण काय?

गांधी जयंतीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी माणगाव येथील कुणबी भवन येथे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे याच्या नावे असलेल्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान तर्फे अगंणवाडी सेविकांना साहीत्य वाटप करण्यात आले.

पूरग्रस्तांच्या मदतीवरुन अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची शेकापकडून मागणी, नेमकं प्रकरण काय?
रमेश मोरे अदिती तटकरे


रायगड: गांधी जयंतीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी माणगाव येथील कुणबी भवन येथे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे याच्या नावे असलेल्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान तर्फे अगंणवाडी सेविकांना साहीत्य वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये जे मदत वाटप केले त्यावर सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान , पुरग्रस्तांसाठी मदत या नावाचे लेबल तसेच्या तसे लावलेल्या अवस्थेत आढळले. त्या सदंर्भात माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी माणगाव मध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी पक्षावर मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे कार्यकर्ते असा राष्ट्रवादीच्या तसेच सुनिल तटकरे युवा प्रतिष्टानच्या कार्यकर्त्याचा उल्लेख केला. तसेच त्यांना सहकार्य करणा-या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पूरग्रस्तांचं साहित्य वाटल्याचा आरोप

पत्रकार परिषदेमध्ये रमेश मोरे यांनी सर्व साहित्याचे किट खोलून त्यामधील साहीत्य पत्रकारांना दाखवले. त्यामध्ये स्वेटर, चादर, फेसवाँश, साबण, वाँशिगं पावडर, मग, बालदी, स्टुल असल्याने सदर साहित्य हे पुरग्रस्तांसाठीचे आहे. तसेच किट च्या पिशवी वरील सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान-पुरग्रस्तांसाठी मदत चे स्टीकर ही दाखवले. हे सर्व साहित्य राष्ट्रवादी ने व सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान ने गोडावून मध्ये ठेऊन त्याच्या वापर पक्षवाढी साठी गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केला, असा आरोप केलाय.

मुख्यमंत्री व राज्यपालांना भेटून राजीनाम्याची मागणी करणार राज्यपालांना या सदंर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पालकमंत्री अदिती तटकरे याच्यां राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे रमेश मोरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमताचा अभाव

सेना नेते व माजी केद्रींय मंत्री अनंत गिते यांनी श्रीवर्धन येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षावर व खासदार सुनिल तटकरे यांच्यावर आरोप केल्यानतंर आता पुन्हा महाविकास आघाडीतील शेकाप ने ही राष्ट्रवादी पक्ष, सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान सह पालकमंत्री अदिती तटकरे याच्यांवर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडी मध्ये एकत्र असलो तरी सहकारी पक्ष जिते चुकतो ते चुकीचच आहे.22, 23 जुलै रोजी रायगड मध्ये आलेल्या पुरग्रस्तांची क्रुर चेष्टा राष्ट्रवादी केल्याने आपण पालकमत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असे मत रमेश मोरे यांनी व्यक्त केले त्यामुळेच रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये एकमत नसल्याचे सिद्ध झाले. यावेळी रमेश मोरे याच्यांसह जिल्हा परिषद सदस्य आरती मोरे, जिल्हा बँकेंचे सचांलक भाई अस्लम राऊत याच्यांसह शेकाप चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या:

‘जनतेचा आवाज दाबता येत नसतो’, मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

अशोकरावांवर आरोप करत रडत रडत शिवसेना सोडण्याची घोषणा, साबणेंच्या आरोपाला आता चव्हाण यांचं प्रत्युत्तर

PWP party leader Ramesh More demanded resignation of state minister Aditi More over help of flood affected people

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI