रत्नागिरी : चिपळूण परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. चिपळूणमध्ये असाच पाऊस सुरू राहीला, तर मात्र समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केलेय. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यानं शहरामध्ये जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.