कणकवलीतील रिक्षाचालकांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; उद्या रिक्षा ठेवणार बंद

गेल्या  अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दरम्यान आता या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कणकवलीतील रिक्षाचालक, मालक संघटनेने देखील एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कणकवलीतील रिक्षाचालकांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; उद्या रिक्षा ठेवणार बंद
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 10:35 AM

सिंधुदुर्ग: गेल्या  अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दरम्यान आता या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कणकवलीतील रिक्षाचालक, मालक संघटनेने देखील एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उद्या शहरातील रिक्षा बंद राहाणार असून, इतर खासगी वाहतूक देखील बंद ठेवण्यात यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

2776 कर्मचारी निलंबित 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एसटी सुरू नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि कामावर  रुजू व्हावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आता सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 2776 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

काय आहेत मागण्या?

राज्य परिवहन महामंडळाचे प्रशासकीय सेवेत विलनिकरण करावे. एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये करून, त्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा. महागाई भत्ता, घरभाडे आणि वेतनात वाढ करावी, अशा  विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी संप पुकारला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या 

Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!

महाराष्ट्र, बंगाल अन् केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

… तर राजीवजी आज खूप आनंदी असते; प्रज्ञा यांनी शेअर केला राजीव सातव यांचा संसदेतील व्हिडीओ

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.