सांगलीत मुसळधार पाऊस, कृष्णेची पाणीपातळी 23 फुटांवर, पूर भागात आपातकालीन यंत्रणा सतर्क

पूर पट्ट्यातील मालमत्ता धारकांना पुराचे पाणी वाढताच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.  (Sangli Heavy Rain Krishna River Flood)

सांगलीत मुसळधार पाऊस, कृष्णेची पाणीपातळी 23 फुटांवर, पूर भागात आपातकालीन यंत्रणा सतर्क
sangli rain
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:28 AM

सांगली : सांगली जिल्हा आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर पाहायला मिळत आहे. तसेच सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं, असे आदेशही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. त्याशिवाय पूर पट्ट्यात आपत्कालीन यंत्रणाही कार्यन्वित करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Sangli Heavy Rain Krishna River Flood emergency services operation in some areas)

सांगलीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर

सांगली जिल्ह्यात काल रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून पहाटेही पावसाचा जोर कायम आहे. सांगलीत पावसाचा जोर वाढल्यामुळे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आणली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व सज्जतेचे आदेश दिले आहेत. तसेच पूर पट्ट्यात आपत्कालीन यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहेत. त्याशिवाय संभाव्य पावसाळा लक्षात महापालिका यंत्रणा सर्व साधनासहित सज्ज झाली आहे.

सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा, पालिकेची सूचना

सांगली आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पूर पट्ट्यातील लोकांना अलर्ट करण्याचे काम सुरू केले आहे. मागील महापुराचा अनुभव पाहता मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूर पट्ट्यातील मालमत्ता धारकांना पुराचे पाणी वाढताच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या घाटावर नजर

तसेच ज्या नागरी वस्तीत पहिल्यांदा पाणी येते अशा ठिकाणच्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेची अग्निशमन यंत्रणाही संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहे. तर सांगली आणि मिरजेच्या कृष्णा नदीच्या घाटावर अग्निशमन विभागाकडून पातळीवर नजर ठेवली जात आहे.

त्याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून मंगलधाम येथील कंट्रोल रूममधून कृष्णा नदीच्या पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नागरिकांनी आपल्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये. त्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यात रात्रभरापासून तुफान पाऊस बरसत आहे. तर सकाळीही जोरदार पाऊस सुरु झाला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात 2 बंधारे, पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा आणि सांगलीतील सांगलीवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाणीची पातळीही जवळपास 23 च्या वर गेली आहे.

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आव्हान केलं आहे. जिल्ह्यात असाच पाऊस राहिला तर नदीच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Sangli Heavy Rain Krishna River Flood emergency services operation in some areas)

संबंधित बातम्या : 

मुंबईत पावसाचा कहर, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा  

Panchaganga River | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.