AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातपंचायत जाचाला कंटाळून आत्महत्या प्रकरणी आणखी 7 आरोपींना अटक

जातपंचायतने जमिनीच्या व्यवहारात पती-पत्नीला ठोठावलेला 2 लाख रुपयांचा दंड न दिल्याने वाळीत टाकत त्यांचा छळ केला जात होता. दंड न दिल्याने काटेरी चाबकाचे फटके मारून जबरदस्तीने विष्ठा खायला भाग पडल्याचा तर पीडित महिलेला जातपंचायतसमोर नग्न उभे केल्याचा आरोप आहे.

जातपंचायत जाचाला कंटाळून आत्महत्या प्रकरणी आणखी 7 आरोपींना अटक
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 11:54 PM
Share

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचे प्रकरणी आणखी 7 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यापूर्वी 2 आरोपींना अटक केली होती, त्यामुळे आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. जातपंचायत छळ व आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी ही अटक केली आहे. आनंद नगर पोलीस ठाण्यात 25 जणांसह इतर 10 ते 15 जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा व जातपंचायत प्रतिबंधक गुन्ह्याची नोंद आहे पोलिसांचे अटक सत्र सुरू आहे. (seven accuse arrest suicide case due to caste panchayat harassment)

पतीची विष पिऊन आत्महत्या

जातपंचायतने जमिनीच्या व्यवहारात पती-पत्नीला ठोठावलेला 2 लाख रुपयांचा दंड न दिल्याने वाळीत टाकत त्यांचा छळ केला जात होता. दंड न दिल्याने काटेरी चाबकाचे फटके मारून जबरदस्तीने विष्ठा खायला भाग पडल्याचा तर पीडित महिलेला जातपंचायतसमोर नग्न उभे केल्याचा आरोप आहे. जात पंचायतीच्या शिक्षेत अपमान झाल्याने खचून पती पत्नी यांनी 24 सप्टेंबर रोजी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यात पतीचा मृत्यू झाला.

आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

वसंत छगन काळे, संतोष वसंत काळे उर्फ बप्पा, नामदेव वसंत काळे ( तीघे रा. डिकसळ, ता. कळंब) शहाजी राजेंद्र पवार, संजय कालिदास काळे, बजरंग मोतीराम चव्हाण व बप्पा मोतीराम चव्हाण (चौघे रा. दत्तनगर, ढोकी) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी डिकसळ व ढोकी शिवारातून अटक केली असून, पुढील कार्यवाहीस्तव आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून गुन्ह्यातील त्यांच्या अन्य साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

उस्मानाबादमधील काकानगरमधील सोमनाथ छगन काळे (45) आणि अनिता सोमनाथ काळे (40) यांच्याविरोधात जातपंचायत बसवण्यात आली होती. सोमनाथ यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवण्यात आला होता. यासाठी सांजा (ता. उस्मानाबाद) पेढी येथे 22 सप्टेंबरला ही पंचायत बसवण्यात आली होती. या आरोपामुळे पती-पत्नीला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यातील 20 हजार रुपये वसूलदेखील करण्यात आले होते. मात्र उर्वरीत 1 लाख 80 हजार रुपयांसाठी या दाम्पत्यामागे जातपंचायतीने तगादा लावला होता. यामुळे या दाम्पत्याने वैतागून 24 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना पत्नी अनिता यांची प्रकृती सुधारली, मात्र सोमनाथ यांची प्रकृती ढासळली. 30 सप्टेंबरला त्यांना सोलापूरला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. (seven accuse arrest suicide case due to caste panchayat harassment)

इतर बातम्या

दिल्लीनंतर महाराष्ट्रात विजेचे संकट गडद, कोळशाअभावी 13 युनिट बंद

BSNL च्या 4G नेटवर्कवरून केला पहिला फोन; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...