लोकं तीन गाण्यांचे दीड लाख देतात आणि…; इंदोरीकर महाराज यांनी सुनावलं

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात. तीनच गाणे पण शिट्ट्या?. गाडा आला आणि घाटात राडा झाला.

लोकं तीन गाण्यांचे दीड लाख देतात आणि...; इंदोरीकर महाराज यांनी सुनावलं
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 9:48 AM

बीड : इंदोरीकर महाराज हे कीर्तनकार आहेत. ते त्यांच्या कीर्तनामधून समाजप्रबोधन करतात. पण, टीकाही तशीच करतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. परंतु, सध्या गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमाला गर्दी असते. त्यासाठी ती एक ते दीड लाख रुपये फीस घेत असल्याचं सांगितलं जातं. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कीर्तनकाराने थोडे जास्त पैसे मागितल्यास लोकं कीर्तनकारांवर टीका करतात. मग, दीड लाख रुपये देऊन लोकं काय करतात, अशी टीका इंदोरीकर महाराज यांनी केली.

बीडनंतर आता शिर्डी येथे कीर्तनादरम्यान इंदोरीकर महाराजांनी नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय. शिर्डी येथे भरलेल्या देशातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपानिमित्ताने काल इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

हे सुद्धा वाचा

तीनच गाणे पण शिट्ट्या?

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात. तीनच गाणे पण शिट्ट्या?. गाडा आला आणि घाटात राडा झाला. असे म्हणत, थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदोरीकर महाराजांनी उपस्थितांना दिलाय.

आपली संस्कृती टिकवणे गरजेचे

इंदोरीकर महाराज म्हणाले, कीर्तनकाराने पाच हजार रुपये जास्त मागितले तर लोकं म्हणतात, यांनी बाजार मांडला. देवाचा बाजार मांडला. तीन गाण्यांचे लोकं दीड लाख रुपये देतात. तीनच गाणे पण, शिट्या…कार्यक्रमात राडा होतो.

थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेचं आहे. या कृषी प्रदर्शनात आपल्याला काही कामं करायची आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे. संस्कृती टीकवायची आहे, असं आवाहन इंदोरीकर महाराज यांनी केलं.

बीडमध्ये केली होती टीका

इंदोरीकर महाराज यांनी यापूर्वी बीड येथे गौतमी पाटीलबद्दल वक्तव्य केलं होतं. कीर्तनकारांनी पाच हजार रुपये मागितले तर आमच्यावर लोकं टीका करतात. तिकडे तीन लाखला तीनच गाणी ऐकतात. आणि ३०० पोरांच्या चड्डा फाटतात. २०० पोरांचे गुडघे फुटतात. मारामाऱ्या झाल्या. शेतकरी तुम्ही बोलायचं नाही. असंही इंदोरीकर महाराज म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.