अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला, कारण काय?

मनोज गाडेकर

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 2:49 PM

कोल्हार येथील एका कार्यक्रमात स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला. जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वातील आंदोलक शिवसैनिकांनी अब्दुल सत्तार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. तसेच सरकार शिवसेनेचे असताना मुख्यमंत्र्यांचा फोटो बॅनरवर नसल्याचं सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिलं.

अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला, कारण काय?

अहमदनगर : कोल्हार येथील एका कार्यक्रमात स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला. जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वातील आंदोलक शिवसैनिकांनी अब्दुल सत्तार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. तसेच सरकार शिवसेनेचे असताना मुख्यमंत्र्यांचा फोटो बॅनरवर नसल्याचं सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिलं.

विशेष म्हणजे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषद शाळा इमारत भूमिपूजनासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार हे एकाच मंचावर आले होते. शिवसेनेचे मंत्री असलेल्या प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमात शिवसैनिकांना डावलले, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हाप्रमुख खेवरे यांनी दिलाय.

विखे-सत्तार एकाच मंच्यावर, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे आणि शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार अहमदनगरमधील या कार्यक्रमात एकत्र आल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलं. यावरुन अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत. त्यात शिवसैनिकांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला डावलल्याचा आरोप करत थेट सत्तार यांची गाडी अडवल्यानंही या चर्चेत भरच पडलीय.

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला

दरम्यान, 29 ऑगस्टला अब्दुल सत्तार हे ठरलेल्या वेळेनुसार जुन्नर तालुक्यात मु. पो. पारगाव या ठिकाणी उपस्थित राहिले. तालुक्यात राज्याचे मंत्री महोदय येत असताना प्रोटोकॉलप्रमाणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यमान आमदाराला त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचे असते, पण राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांची स्वागतासाठी उपस्थिती लावणं, तर लांबच राहिलं, ते कार्यक्रमालाही वेळेत आले नाहीत.

वाट पाहूनही बेनके येईना

आमदार बेनकेंची आपण 20-30 मिनिटे वाट पाहू, तोवर शाखेचे उद्घाटन करुन आपण व्यासपीठावर प्रास्ताविक मनोगताला सुरुवात करु, आमदार आल्यानंतर नूतन ग्रामसंसद ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करु, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली, पण तरीही आमदार अतुल बेनके वेळेवर न आल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यानी कार्यक्रमादरम्यान स्टेज सोडून जाणे पसंद केले. मात्र या घटनाक्रमाबददल स्थानिक शिवसेना कायकर्त्यांनी शिवसेनेच्या घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली. आता महाविकास आघाडीत याचे राजकीय पडसाद उमटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

 पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा, मृतदेह खाटेवर टाकून नेण्याची वेळ, नागरिकांत संताप

नाव राणे अन् चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांचा राणेंवर बोचरा वार

Shivsena supporter stop Abdul Sattar vehicle in Kolhar Shirdi Ahmednagar

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI