परळी : नांदेडमधील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येचे तीव्र पडसाद परळीत उमटले आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी परळीत सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य मूकमोर्चा (Morcha) काढण्यात आला होता. बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन करावे अशा आशयाचे निवेदन शासनाला तहसिल कार्यालयाच्या मार्फत देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूकमोर्चा काढण्यात आला होता. तेथून मोर्चा मौलाना अबुल कलाम आझाद चौक, सिंचन भवन मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. परळीत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने माहेश्वरी बांधव आणि व्यापारी सहभागी झाले होते. (Silent March of Maheshwari Samaj for arrest of accused in Sanjay Biyani murder case in Nanded)