“नरेंद्र मोदींचा 9 वर्षाचा काळ हा सुवर्णकाळ”; भाजपच्या मंत्र्याने मोदी सरकारचा गवगवा केला…

केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत गेल्या पाहिजेत, तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याची त्यांना जाणीव करून द्यावी म्हणून प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहे.

नरेंद्र मोदींचा 9 वर्षाचा काळ हा सुवर्णकाळ; भाजपच्या मंत्र्याने मोदी सरकारचा गवगवा केला...
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 6:16 PM

सिंधुदुर्ग : आगामी काळातील निवडणुकांच्या तारीख जाहिर झाल्या नसल्या तरी भाजप आणि विरोधकांकडूनही आता जय्यत तयारी केली जात आहे. राज्यातील विविध पक्षांनी आता आपापल्या जागेसाठी चाचपणी सुरु केली असून एकमेकांच्या जागांवर आता दावा केला जात आहे. त्यावरून आता विविध पक्षांचे राजकीय कार्यक्रम सुरु झाले आहेत. त्यामुळे आता भाजपनेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवून लोकांमध्ये भाजपच्या कामाचा प्रचार केला जात आहे.

त्यामुळे आजही सिंधुदुर्गमध्ये भाजपच्यातीन घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या कामांची यादी वाचून दाखवत भाजप जनसामान्यांसाठी ते कसे काम करत आहे याची माहिती त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असताना त्यांनी दिली.

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपवर विरोधकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने टीका केली जात असते. त्यामुळे आता भाजपकडून योग्य पद्धतीने भाजपचा प्रचार करून केंद्राकडून देशातील नागरिकांसाठी कोण कोणत्या योजना राबवल्या आहेत, त्याची माहितीही नारायण राणे यांनी यावेळी दिली.

नारायण राणे यांनी सांगितले की, होणाऱ्या निवडणुकात केंद्रात आणि राज्यात भाजपला विजय मिळवायचा आहे, त्यामुळे निवडणूक नीती ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या बैठका घेतल्या जात आहेत.

यावेळी नारायण राणे यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात 54 योजना घोषित केल्या आहेत, आणि त्याचा लाभ देशातील कोट्यवधी लोकांना मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत गेल्या पाहिजेत, तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याची त्यांना जाणीव करून द्यावी म्हणून प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत असंही नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच बुद्धिवंत लोकांच्या बैठका घेऊन मोदी सरकारचा कारभार कसा चालला आहे, याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहेत याची माहिती देताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतूक केले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या कार्याची ओळख करुन देताना त्यांनी सांगितले की, 9 वर्षांचा मोदींचा काळ हा सुवर्णकाळ म्हटले तर काही चुकीचं होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. तर 2030 नंतर अमेरिका,चीन नंतर भारत त्याच जागी पोचणार असल्याचे सांगत त्यांनी सांगितले की, मोदींच्या नेतृत्वाखाली ही जय्यत तयारी सुरू आहे असंही त्यांना यावेळी सांगत त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे.

यावेळी त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याविषयी काम करण्याच्या मुद्यावर बोलताना सांगितले की, दीपक केसरकर हा माणूसच आहे त्यामुळे भविष्यात एकत्र आलो तर वावगं काही वाटणार नाही असं सांगत कोकणातील बदलत्या राजकारणाची गोष्ट सांगितली.

तर वैभव नाईक यांच्याविषयी बोलताना सांगितले की, वजन वाढल म्हणजे अक्कल वाढते अस नाही.वैभव नाईकला राजकारणातल काय कळतं असा खोचक सवालही त्यांना विचारला आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.