दीपक केसरकर यांच्या घरासमोर मोर्चा; या मागण्यांसाठी आंदोलक आक्रमक

सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्या घरासमोर हे आंदोलन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दीपक केसरकर यांच्या घरासमोर मोर्चा; या मागण्यांसाठी आंदोलक आक्रमक
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 3:31 PM

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. परंतु, त्यांची भरती केली जात नाही. सावंतवाडी येथील दीपक केसरकर हे शिक्षण विभागाचे मंत्री आहेत. त्यांच्याच जिल्ह्यात डी. एड. बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. रिक्त जागा भरण्यात याव्या, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते. नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अश्या घोषणा देत डी.एड. बेरोजगार स्थानिकांना सेवेत सामावून घेण्यासाठी दीपक केसरकर यांच्या घरासमोर शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढत आंदोलन केले.

sindhudurg 2 n

यांच्या नेतृत्वात आंदोलन

सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्या घरासमोर हे आंदोलन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आंदोलनाने उडाला गोंधळ

यावेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची … अशा जोरदार घोषणा दीपक केसरकर यांच्या विरोधात देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका केली आहे. या आंदोलनाने एकच गोंधळ उडाला होता.

जिल्ह्यात ९०० पदं रिक्त

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहते. त्यामुळे या आंदोलनात सहभाग असल्याचं सांगण्यात आलं. स्थानिक डी.एड. उमेदवार आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. शिक्षण विभागात ८५० ते ९०० पदं रिक्त आहेत. स्थानिकांना नोकऱ्या नाहीत. आपल्या जिल्ह्यात उमेदवार आहेत. पण, नोकरीच्या रिक्त जागा भरल्या जात नाही. जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून २००७ ला भरती झाल्या त्याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी.

आंदोलकांना घेतले ताब्यात

शिक्षणमंत्री हाय हाय. स्थानिकांना रोजगार मिळाल्याच पाहिजे. अशा घोषणा देण्यात आल्या. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. अशा घोषणा देत असताना पोलीस आले. त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने सोडून दिले. योगेश धुरी आणि मंदिर शिरसाट यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

Non Stop LIVE Update
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.