AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राड्यानंतरही गड राखला, जिल्हा बँकेवर राणेंचेच वर्चस्व; निकालाची सहा वैशिष्ट्ये काय? वाचा सविस्तर

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठं धुमशान रंगलं. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळंच वळण लागलं.

राड्यानंतरही गड राखला, जिल्हा बँकेवर राणेंचेच वर्चस्व; निकालाची सहा वैशिष्ट्ये काय? वाचा सविस्तर
Sindhudurg district bank election result
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 6:53 PM
Share

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठं धुमशान रंगलं. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळंच वळण लागलं. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचं नाव आलं. त्यानंतर नितेश राणेंनी कोर्टात अंतरीम जामिनासाठी धाव घेतल्याने या निवडणुकीची रंजकता अधिकच वाढली. या सर्व नाट्यानंतरही बँकेवरील आपली सत्ता कायम राखण्यात केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यश मिळविले आहे. या निवडणुकीच्या सहा वैशिष्ट्यांवर टाकलेली ही नजर.

राणे विरुद्ध शिवसेना थेट लढत

ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी ती राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशीच होती. जिल्हा बँकेत भाजपला हरवणं म्हणजे राणेंच्या वर्चस्वला धक्का लावणं असं समीकरण होतं. त्यामुळे शिवसेना त्वेषाने या निवडणुकीत उतरली होती. पण तरीही राणेंनी 11 जागा जिंकत बँकेवर आपलंच वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं. तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकून मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं आहे.

संचालक मंडळातील अनेकांचा पराभव

या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या निवडणुकीत सर्व संचालक मंडळातील बऱ्याच सदस्यांचा पराभव झाला आहे. स्वत: विद्यमान अध्यक्षांचाही पराभव झाला आहे. जिल्हा बँकेत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, माजी जिल्हा अध्यक्ष राजन तेली, प्रकाश मोर्ये, गुरुनाथ पेडणेकर, विलास गावडे, विकास सावंत, मधुसूदन गावडे, गुलाबराव चव्हाण, अविनाश माणगांवकर, दिगंबर पाटील, प्रकाश गवस या विद्यमान संचालकाचा पराभव झाला आहे. विद्यमान संचालकांपैकी 12 संचालकांचा या निवडणुकीत पराभव झाला.

अजितदादांची जादू नाहीच

या निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार वळतील असा कयास वर्तवला जात होता. मात्र, अजितदादांचा जादूही या निवडणुकीत चालला नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तर अवघे दोनच उमेदवार निवडून आले आहेत.

समृद्धी पॅनलचा धुव्वा

ही निवडणूक विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वात लढली गेली. या निवडणुकीत सावंत यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे समृद्धी पॅनल उतरले होते. पण या पॅनलचा पराभव झाला. या निवडणुकीत राणे पॅटर्नच चालला.

2008ची पुनरावृत्ती

या निवडणुकीत 2008ची पुनरावृत्ती झाली आहे. त्यावेळी सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव आणि माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यात अटीतटीची लढत होऊन समसमान मते पडली होती. तेव्हा ईश्वरचिठ्ठीद्वोरे निकाल काढण्यात आला. त्यावेळी सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव हे विजयी झाले होते. त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा पाहायला मिळाली. आज महाविकास विकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलचे प्रमुख सतीश सावंत आणि त्यांचे विरोधी उमेदवार विठ्ठल देसाई यांच्यात समसमान मते पडली. तेव्हा ईश्वरचिठ्ठीद्वोरे विठ्ठल देसाई हे विजयी झाले.

तेलींचा पराभव

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला तो राजन तेली यांचा पराभव. राजन तेली हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते भाजपच्या सिद्धीविनायक सहकार पॅनलचे प्रमुख आणि माजी जिल्हाबँक अध्यक्ष आहेत. या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी पराभव केला. त्यानंतर तेली यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आपण यापूर्वीच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असा दावा तेली यांनी केला.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 10 जागा जिंकल्या; आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय भाजपचा जल्लोष

Sindhudurg Bank Election Result | राणेंनी वचपा काढला ! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता, महाविकास आघाडीला जबर हादरा

Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या

Follow Us
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?