ऊसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरुच

आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला.

ऊसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरुच
महेश खराडे, संजयकाका पाटील

सांगली: शेतकऱ्यांचं ऊस बील मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

35 ते 40 कोटी रुपयांचं बील थकित

भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव साखर कारखान्याने 35 ते 40 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं ऊस बिल अद्याप ही दिला नाही. अनेक वेळा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी ऊस बिल लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते. पण अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तासगावमध्ये भव्य असा मोर्चा खासदारांच्या कार्यलयावर काढला. यावेळी मोर्चा दरम्यान पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ही लावला होता. यावेळी आंदोलन ठिकाणी खासदार संजय काका पाटील आले. आंदोलकांची व्यथा ऐकून घेतल्या.

कित्येक दिवस होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे भव्य मोर्चा काढल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं. तर, कारखान्याची नवीन सुरुवात केली आणि त्यात साखर पडून राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांना बिल देणे अवघड झाले आहे. काही बँकेत कर्जसाठी प्रकरण दिले आहेत. येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना बिलं दिली जातील.असे मत खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले.

ठिय्या सुरुच राहणार

शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी खासदारांना चांगलेच धारेवर धरले.बिल मिळे पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही संजयकाका पाटील यांनी सांगितले.

इतर बातम्या:

स्वाभिमानीचा ऊस बिलासाठी आंदोलनाचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर 21जूनपासून पैसे जमा होणार, संजयकाका पाटील यांची माहिती

लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटाचा फटका, सांगलीत शेतकऱ्याला 25 लाखांचं नुकसान, 10 एकर पेरू बागेवर कुऱ्हाड

मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक

Swabhimani Shetkari Sanghatna Protest at office of MP Sanjaykaka Patil at Tasgaon for sugarcane bill