मुंबई-पुणे एक्सप्रेसवे-वर टेम्पो कंटेनरला धडकला, कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे-वर बोरघाटात खोपोली हद्दीत टेम्पो कंटेनरला धडकला. मागून टेम्पो धडकल्याने चालकाच्या कॅबिनमध्ये चालक अडकला होता. रेस्क्यू ऑपरेशन करुन चालकाला बाहेर काढण्यात आले. पुणे-निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात चालकाला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे-वर टेम्पो कंटेनरला धडकला, कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश
Express way accident


रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे-वर बोरघाटात खोपोली हद्दीत टेम्पो कंटेनरला धडकला. मागून टेम्पो धडकल्याने चालकाच्या कॅबिनमध्ये चालक अडकला होता. रेस्क्यू ऑपरेशन करुन चालकाला बाहेर काढण्यात आले. पुणे-निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात चालकाला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आयआरबी यत्रंणा, डेल्टा फोर्स, देवदुत, खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस मदतीला होते.

पाहा व्हिडीओ – 

एक टन काचा अंगावर पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू

एक टन काचा अंगावर पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टेम्पोत काचा भरत असताना अपघात झाल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. कोल्हापुरातील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर शहराजवळील नागाव भागात ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. टेम्पोत काचा भरत असताना क्रेनची तार तुटल्याने विचित्र अपघात झाला. यावेळी एक टन वजनाच्या काचा अंगावर पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. संदीप खोरसे असे मयत टेम्पो चालकाचे नाव आहे. कारखाना मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत.

टेम्पो-ट्रेलरच्या मधे स्वीफ्टचा चक्काचूर

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मल्टीव्हेहीकलचा भीषण अपघात झालाय. सहा गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पुण्याहुन मुबंईकडे जाताना खोपोली हद्दीतील बोरघाटामध्ये सहा वाहने एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. यामध्ये कोबंडी वाहुन नेणाऱ्या टेम्पो आणि ट्रेलरमध्ये स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात स्वीफ्टकारमध्ये असलेले दोन प्रवाशी अडकले होते. रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. कारमधील अडकलेले दोन्ही मृतदेह काढण्यात आले असून पुढील प्रक्रीयेकरीता खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले. तर टेम्पोमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

टेम्पो-ट्रेलरच्या मधे स्वीफ्टचा चक्काचूर, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील घटना

एक टन काचा अंगावर पडून टेम्पो चालकाचा मृत्यू, विचित्र अपघाताने कोल्हापुरात हळहळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI