या भागात बिबट्याची दहशत, बालकाचा घेतला बळी, वनविभाग झाले सतर्क पण…

बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या परिसरात आणखीन बिबट्या असल्याने वन विभागाकडून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

या भागात बिबट्याची दहशत, बालकाचा घेतला बळी, वनविभाग झाले सतर्क पण...
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:35 AM

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) हे गुजरात राज्याच्या सीमेवर लागून आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरू असतो. हे वन्यप्राणी मानवास हानिकारक ठरत आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान करतात, तर दुसरीकडे काही वन्यप्राणी हे मानवाला इजा पोहचवत असतात. देवमोगरा पुनर्वसन भागात तर एका सात वर्षीय बालकाला बिबट्याने आपली शिकार केली. त्यामुळे या परिसरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. गुजरात वनविभागाने एका बिबट्याला (Leopard) जेरबंद केले. पण, अजून दुसरा बिबट्या या परिसरात दहशत (Leopard Terror) पसरवत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत आहेत.

सात वर्षीय बालकाचा घेतला बळी

अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन शिवारातील एका सात वर्षाच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून जीवे ठार मारले होते. या परिसरातील नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी केली जात होती. त्यासाठी गुजरात वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेलबंद केलं आहे.

हे सुद्धा वाचा

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

देवमोगरा पुनर्वसन या गावातील सात वर्षाच्या सुरेश पाडवी हा जेवण करत असताना बिबट्याने हल्ला केला. त्याला फरफडत नेऊन त्याला बिबट्याने ठार केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी केली जात होती.

वनविभागाकडे केली तक्रार

नागरिकांनी या बिबट्याची तक्रार वनविभागाकडे केली होती. मात्र महाराष्ट्राच्या वन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत होतं. बिबट्याने नागरी वस्तीत शिरूर हल्ला केल्याने गुजरात वनविभाग सतर्क झाले. बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून जेलबंद करण्यात आले आहे.

सतर्क राहण्याचे आवाहन

बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या परिसरात आणखीन बिबट्या असल्याने वन विभागाकडून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आले आहे. एक बिबट्या गेला तरी दुसरा बिबट्या तयार आहे. त्यामुळे किती बिबट्यांचा सामना करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.