VIDEO: दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात, तुम्हीच न्याय देऊ शकता; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचं नारायण राणेंना साकडं

कसंही करून आम्हाला जगवा, अशी साद चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुपारी घातली होती. त्यानंतर अवघ्या तासाभरातच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे चिपळूणच्या बाजारपेठेत आले. (narayan rane)

VIDEO: दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात, तुम्हीच न्याय देऊ शकता; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचं नारायण राणेंना साकडं
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 4:13 PM

चिपळूण: कसंही करून आम्हाला जगवा, अशी साद चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुपारी घातली होती. त्यानंतर अवघ्या तासाभरातच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे चिपळूणच्या बाजारपेठेत आले. त्यावेळी, दादा, तुम्ही कोकणाचे दैवत आहात. तुम्हीच न्याय देऊ शकता, असं म्हणत या व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी राणेंनीही सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन या व्यापाऱ्यांना दिलं. (Union minister Narayan Rane reviews flood situation in Chiplun)

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आमचं सर्व काही पुरात वाहून गेलं आहे. आमचं कंबरडं मोडलं आहे. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्राज जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो, असं या व्यापाऱ्यांनी राणेंना सांगितलं.

निवेदन फॅक्स करा, केंद्राकडून मदत देतो

यावेळी नारायण राणे यांनी या व्यापाऱ्यांना धीर दिला. तुम्ही तुमच्या मागण्यांचं काही निवेदन तयार केलं आहे का? नसेल तर तुमच्या महत्त्वाच्या तीन मागण्यांचं निवेदन तयार करा. उद्या सोमवार आहे. हे निवेदन मला फॅक्स करा. आम्ही आमच्या लेव्हलला केंद्र आणि राज्यस्तरावरून तुम्हाला मदत मिळवून देऊ, असं राणे यांनी सांगितलं.

पक्की घरं देणार

दरम्यान, चिपळूणला येण्यापूर्वी राणे आधी सकाळी तळीयेमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून मीडियाशी संवाद साधला होता. ही अत्यंत दुखद घटना आहे. या दुर्घटनेत 87 लोक गेल्याचं कळतं. 44 मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.

स्थानिक सांगतील तिथे पुनर्वसन

या गावातच आपलं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरती वसाहत तयार करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोक सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्व घटनेची माहिती दिली जाईल. नुकसानीचं स्वरुप सांगितलं जाईल. त्यांनीही मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे, असं त्यांनी सांगितलं. (Union minister Narayan Rane reviews flood situation in Chiplun)

संबंधित बातम्या:

सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा कधी करणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात….

मुख्यमंत्री म्हणाले, ‘कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’, ठाणे शिवसेनेकडून कोकणातील 25 हजार कुटुंबियांना मदत!

(Union minister Narayan Rane reviews flood situation in Chiplun)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.