AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट; लॉजिकही सांगितलं

नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला?

मोठी बातमी ! येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट; लॉजिकही सांगितलं
narayan raneImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 12, 2023 | 1:59 PM
Share

सिंधुदुर्ग : कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दोन्हीकडून एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक रंगत असते. त्यामुळे कोकणातील राजकारण सतत तापलेलं असतं. आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार आहे, असा गौप्यस्फोटच वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या विधानामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

येत्या दोन महिन्यात राणेंच मंत्रिपद जाणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असं वैभव नाईक म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचं मंत्रिपद का जाणार याचं कारणही सांगितलं. त्यावर ना भाजपकडून प्रतिक्रिया आलीय, ना नितेश राणे किंवा निलेश राणे यांच्याकडून. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वडिलांना आधी विचारा

यावेळी ईडीच्या चौकश्यांवरून त्यांनी टीका केली. नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

राऊतांचाही दावा

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता. नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याचे मंत्री आहेत. त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. कारण शिंदे गटाच्या लोकांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार?

दरम्यान, 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा छोटा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात शिंदे गटाला मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून गजानन कीर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची चर्चाही होती. मात्र, या वृत्ताला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.

Follow Us
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?