नांदेडसह हिंगोली भूकंपानं हादरलं, यवतामाळच्या दोन गावात भूकंपाचं केंद्र, तिथं काय घडलं?

नांदेडसह हिंगोली भूकंपानं हादरलं, यवतामाळच्या दोन गावात भूकंपाचं केंद्र, तिथं काय घडलं?
संग्रहित छायाचित्र.

आज सकाळी 8:33 मिनिटांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे.

विवेक गावंडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 11, 2021 | 3:55 PM

यवतमाळ: आज सकाळी 8:33 मिनिटांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच कोणतीही हानी झालेली नाही. महागाव तहसिलदार आणि त्यांची पथकानं गावांमध्ये भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. (Yavatmal District Collector Amol Yedage said there is no casualty and any loss at center of earthquake which experienced at Nanded and Hingoli)

मुडोना आणि साधूनगरमध्ये भूकंपाचं केंद्र

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले. केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली.

आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जीवित व वित्त हानी झालेली नसल्याचेही इसळकर यांनी सांगितले . तरीही आमचं पथक दिवसभर काही घडामोडी झाल्यास परिस्थिती हाताळण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

नांदेड शहरात भूकंपाचे धक्के

नांदेड शहराच्या काही भागात सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी साडे आठच्या आसपास अगदीच सौम्य स्वरूपाचा धक्का जाणवला.

हिंगोलीत भूकंपाचे तीन धक्के

हिंगोली जिल्ह्यात एका पाठोपाठ भूकंपाचे 3 सौम्य धक्के बसले. जिल्ह्यात मागील अनेक वर्षा पासून धक्के जाणवतात नागरिक भयभीत झाले होते.

इतर बातम्या:

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले

कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ

(Yavatmal District Collector Amol Yedage said there is no casualty and any loss at center of earthquake which experienced at Nanded and Hingoli)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें