AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओवैसी कोणाचा बाप आला तरी संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही – फडणवीस

महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, या शहरावर भगवा फडकवायचा असेल तर एकजूट राहावे लागेल. यावेळी त्यांनी औवैसींवर ही टीका केली,

ओवैसी कोणाचा बाप आला तरी संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही - फडणवीस
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 09, 2024 | 8:15 PM
Share

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजीनगरमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी ओवैसी आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ओवैसी छत्रपती संभाजी नगर. कोणाचा बाप पैदा झाला तरी हे नाव आता बदलू शकत नाही. एमआयएमच्या सभेत एका महिलेने म्हटले. हा संभाजी राजे कोण होता. हे संभाजीनगर कसे झाले. औरंग्या फितुरी झाली नसती तर कधीच संभाजी महाराज तुझ्या हाती लागले नसते.’

महायुतीच्या सरकारने संभाजी महाराज यांचं नाव या शहराला दिले. आता आम्ही जागे झालो आहोत. आता व्होट जिहाद सुरु झालाय. लोकसभेच्या निवडणुकीत हे पाहायला मिळालं. योगींनी आपल्याला सांगितले बटेंग तो कटेंगे. मोदींनी ही सांगितलं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे. संभाजीनगर २३ तारखेला देखील भगवाच असेल हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे. काही लोकांनी भगव्यासोबत गद्दारी सुरु केली. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला संभाजीनगर नाव दिलं. पण अलीकडच्या काळात काही नेत्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायला लाज वाटते. ही निवडणूक एकजूट दाखवण्याची निवडणूक आहे. असं ही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, ‘प्रत्येक घरात आपण आता पाणी पोचवणार आहोत. कचऱ्याची समस्या असेल किंवा रस्त्यांची अडचण असेल आपण ते सोडवले आहेत. आपण समृद्धी महामार्ग तायर केले. इथे सेन्द्रा या ठिकाणी डीएमयसी सुरू केली आणि देशातील सगळ्या प्रमुख कंपन्या या संभाजीनगरमध्ये आणल्या आहेत. हजारो लोकांचा रोजगार आपण तयार करत आहोत. एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक संभाजीनगरमध्ये होणार आहे.’

‘विमानतळाला आंतराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी धाव पट्टी वाढवण्यासाठी 140 कोटी रुपये आपण दिले. समुद्राला वाहून जाणारे पाणी 54 टीएमसी गोदावरी पत्रात आणून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार आहोत. नवीन क्रीडा विद्यापीठ आपण स्थापन करणार आहोत, आंतराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम संभाजीनगर ला तयार होत आहे. सिडकोचे प्लॉट लीज होल्डचे फ्री होल्डचे केले आहेत. 35 हजार कुटुंबाना सिडको प्लॉटची मालकी आपण देत आहोत.’

’11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या आता 1 कोटी लखपती दीदी तयार करणार आहोत. लेक लाडकी योजना सुरू केली, लेक घरी आली नव्हे तर प्रत्यक्ष लक्ष्मी घरी आली असं वाटलं पाहिजे. मुलींचे मामा मंत्रालयात बसले आहेत ते मुलींच्या शिक्षणाचा खर्च आपलं सरकार करत आहे, मुलींना मोफत शिक्षण देत आहोत.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा