महाराष्ट्रात ऑक्सिजनचा टँकर लिकेजची दुसरी घटना, कोल्हापूरच्या दिशेला जाणारा टँकर लिक, प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न

महाराष्ट्रात ऑक्सिजन टँकर लिकेजची दुसरी घटना आज घडली आहे. सुदैवाने आजच्या घटनेत फारसं काही नुकसान झालेलं नसलं तरी ऑक्सिजनचा मोठा साठा वाया गेला आहे (Oxygen tanker leak at Pune-Bangalore highway)

महाराष्ट्रात ऑक्सिजनचा टँकर लिकेजची दुसरी घटना, कोल्हापूरच्या दिशेला जाणारा टँकर लिक, प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न
कोल्हापूरच्या दिशेला जाणारा ऑक्सिजन टँकर लिक, प्रशासनाचं युद्ध पातळीवर काम सुरु
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 7:32 PM

सातारा : महाराष्ट्रात ऑक्सिजन टँकर लिकेजची दुसरी घटना आज घडली आहे. सुदैवाने आजच्या घटनेत फारसं काही नुकसान झालेलं नसलं तरी ऑक्सिजनचा मोठा साठा वाया गेला आहे. याआधी नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकरद्वारे ऑक्सिजन रिफिल करताना उच्च दाबामुळे गॅस टाकी फुटून ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा अचानक थांबला होता. या दुर्घटनेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला होता. दुसरीकडे राज्यात ऑक्सिजनता मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत साताऱ्यात कोल्हापूरच्या दिशेला जाणारा ऑक्सिजन टँकर लिक झाला आहे (Oxygen tanker leak at Pune-Bangalore highway).

नेमकं काय घडलंय?

पुणे-बंगळुरु महामार्गावर ऑक्सिजन टँकर लिक झाला आहे. हा टँकर कोल्हापुरच्या दिशेला जात होता. टँकरमध्ये जवळपास 10 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असल्याची शक्यता आहे. साताऱ्यातील वाळेफाटा परिसरात हा ऑक्सिजन टँकर उभा करण्यात आला आहे. घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. तसेच सातारा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. लिकेज बंद करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण जवळपास अर्धा तास ते 45 मिनिटे टँकरमधील लिकेज सुरु होतं. त्यानंतर प्रशासनाचं काम सुरु झालं (Oxygen tanker leak at Pune-Bangalore highway).

ऑक्सिजन टँकर लिकेज होण्यामागील कारण काय?

ऑक्सिजन टँकर लिकेज होण्यामागील नेमकं असं काय कारण आहे, याची प्रशासनाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्याने ऑक्सिजन लिक झाल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास अर्ध्या ते पाऊण तासापासून लिकेज सुरु आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना अशाप्रकारे ऑक्सिजन लिक होणं ही दुर्देवाची बाब असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट

देशभरात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा संकट काळात उत्तर प्रदेशात ऑक्सिजन प्लांटमध्ये आज स्फोट झाला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

ऑक्सिजन टँकर लिकचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.