Palghar : पालघर जिल्हा पुन्हा एकदा गरोदर माता मृत्यूमुळे चर्चेत; स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सर्वाधिक मातामृत्यूची नोंद

Palghar : पालघर जिल्हा पुन्हा एकदा गरोदर माता मृत्यूमुळे चर्चेत; स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सर्वाधिक मातामृत्यूची नोंद
माता
Image Credit source: tv9

उपजिल्हा रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये मातांना प्रसूतीसाठी योग्य त्या सेवा मिळत नसल्याने तसेच विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद झाली आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 13, 2022 | 3:31 PM

पालघर: गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे (Corona) सावट होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष कोरोनावर केंद्रित झाल्यामुळे माता यांच्यासाठी असलेल्या आरोग्य सेवांवर दुर्लक्ष झाले. परिणामी माता मृत्यू वाढत गेल्याचे बोलले जात आहे. तर राज्यातील महिला आणि बालविकास विभागाकडून महिला आणि बालविकासाठी महत्वपूर्ण निर्णय हे वेळोवेळी घेतली जातात. त्यामुळे राज्यात महिलांच्या अरोग्य विषयक प्रश्नमार्गी लागताना दिसत आहेत. मात्र आरोग्य विभाग नेमके करते तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण राज्यातील पालघर जिल्हा पुन्हा एकदा गरोदर माता (Pregnant Mothers) मृत्यूमुळे चर्चेत आला आहे. येथे स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मातामृत्यूंची नोंद झाली आहे. तर पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही आरोग्य, कुपोषण, माता मृत्यू, बेरोजगारी आणि इतर समस्याही जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही तशाच भेडसावत आहेत. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक माता मृत्यूची नोंद गेल्या वर्षी (2021-2022) मध्ये झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद झाली आहे. तर 294 बालमृत्यूची नोंद झाली आहे. बालमत्यूचा (Child Mortality) आकडा कमी होत असला तरी माता मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. याआधी 2017-18 मध्ये 19 माता मृत्यूंची नोंद झाली होती.

कुपोषणापाठोपाठ आता माता मृत्यू

पालघर जिल्ह्याच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये कुपोशनाचा विषय गाजत आहे. तर हा प्रश्न काही करता सुटतानाही दिसत नाही. कुपोषणापाठोपाठ आता माता मृत्यूमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढताना दिसत आहे. तसेच गेल्या सात वर्षात सर्वाधिक माता मृत्यू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. मातांना योग्य आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे हे माता मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबरीने पालघर जिल्ह्यात ग्रामीण बहुल भागांमध्ये गरोदर मातांना असलेल्या रक्ताशय याबरोबर उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती, घरी प्रसुती करणे अशा कारणांमुळेही माता मृत्यूची नोंद झालेली आहे. तर सर्वाधिक माता मृत्यूची नोंद गेल्या वर्षी (2021-2022) मध्ये झाली आहे. जो चिंताजनक आहे.

योग्य ती आरोग्यसेवा न मिळाल्याने हे मृत्यू

राज्य शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माता बाल संगोपन कार्यक्रमातंर्गत मातांची तपासणी व त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवल्या जातात. तसेच तपासण्याही करण्यात येतात. मात्र ग्रामिण भागात चित्र हे वेगळे असल्याचेच यावरून दिसत आहे. पालघरमध्ये गरोदर मातांना योग्य अरोग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांना जिल्हा रूग्णालय किंवा इतर ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच रुग्णवाहिका उपलब्ध न होत नाही. याचदरम्यान अनेक गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे.

विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद

जिल्ह्यात कुपोषणापाठोपाठ अरोग्य सुविधांच्या करतरतेमुळे माता मृत्यू झाला आहे. याचबरोबरीने ग्रामीण भागांमध्ये गरोदर मातांना रक्ताशय याबरोबर उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती, घरी प्रसुती करणे अशा कारणांमुळेही माता मृत्यूची नोंद झाली असून या कारणांमुळे 20 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पालघर व डहाणू तालुक्यात सर्वात जास्त मातांची मृत्यू नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

माता मृत्यूचे आकडे वाढल्याने चिंताजनक बाबा

उपजिल्हा रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये मातांना प्रसूतीसाठी योग्य त्या सेवा मिळत नसल्याने तसेच विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद झाली आहे. तर 294 बालमृत्यूची नोंद झाली आहे. हे मृत्यू फक्त आरोग्य विभागाच्या अपयशामुळे होत असल्याचा आता सुर पालघर जिल्ह्यात उमटत आहे. तर गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक मातामृत्यू गेल्यावर्षी झाल्यामुळे ही बाब आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे. पण परिस्थितीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें