शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांनंतर भावजय पल्लवी कौस्तुभ आमटेंनी मौन सोडलं!

आम्हाला वेळ द्या, काळच एक-एका प्रश्नाचं उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया पल्लवी कौस्तुभ आमटे त्यांनी दिली.

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांनंतर भावजय पल्लवी कौस्तुभ आमटेंनी मौन सोडलं!
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 6:53 PM

चंद्रपूर : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे करजगी (Dr Sheetal Amte Karjagi) यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांनी फेसबुकवरुन आमटे कुटुंबीयांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर शीतल यांची सख्खी भावजय पल्लवी कौस्तुभ आमटे (Pallavi Kaustubh Amte) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. करजगी आणि आमटे हे दोन्ही परिवार दुःखात आहेत. काळच प्रश्नांची उत्तरं देईल, अशी प्रतिक्रिया पल्लवी आमटेंनी दिली. (Pallavi Kaustubh Amte talks on Dr Sheetal Amte Karjagi Suicide)

“जे काही घडलं, ते आमच्या परिवारासाठी फार दुर्दैवी आहे. यातून आम्हाला सावरायला खूप वेळ लागणार आहे. डॉ. शीतल आमटे अत्यंत बुद्धिमान आणि गुणवत्तादायी होत्या. त्यांनी जी स्वप्नं पाहिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु, त्या दिशेने काम करत राहू” अशी प्रतिक्रिया पल्लवी आमटे यांनी दिली.

“शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणी जी चौकशी सुरु आहे, त्यातून सगळं समोर येईल. मात्र या नुकसानातून सावरायला आम्हाला वेळ लागणार आहे. आमटे परिवारावर आलेलं हे मोठं अरिष्ट आहे. आम्ही यातून हळूहळू बाहेर येऊ. आनंदवनासोबत समाज जसा नेहमी उभा राहिला, तसाच आमच्यासोबत राहतील.” अशी आशाही पल्लवी आमटेंनी व्यक्त केली.

“शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सासूबाई सुहासिनी करजगी आणि सासरे शिरीष करजगी यांनी फेसबुक पोस्टवर जे लिहिलं, त्यावर सध्या बोलून काही उपयोग नाही. करजगी परिवार-आमटे परिवार सर्वच दुःखात आहेत. त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं असेल, पण सध्या तरी शीतल यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी सहकार्य करावं” असं आवाहन पल्लवी यांनी केलं.

आनंदवन कोण चालवणार यावर सध्या काहीच बोलू शकत नाही. इतक्या लवकर या निर्णयाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आम्हाला वेळ द्या, विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी वेळ लागेल. काळच एक-एका प्रश्नाचं उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गॅझेट्सना आय पासवर्ड, पतीलासुद्धा कल्पना नाही

दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब तसेच इतर गॅझेट्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. डॉ. शीतल यांनी त्यांच्या या गॅझेट्सचे पासवर्ड नुकतेच बदलल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे बदललेल्या पासवर्डबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनादेखील कल्पना नाही. यातील काही गॅझेट्सना सॉफ्टवेअर लॉक आहे. तर काही गॅझेट्सना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

परिणामी या प्रकरणाचा तपास करण्यास, त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यास अडचणी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व गॅझेट्स नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी (IT) तज्ज्ञांकडे पाठवले आहेत. या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मादत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक

शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली आहेत. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कोठून मिळवले याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

आमटे कुटुंबीयांची चौकशी होणार?

तपासात प्रगती होत नसल्याने पोलीस आता आमटे कुटुंबियांची चौकशी करण्याच्या बेतात आहेत. आमटे कुटुंबीयांच्या तपासातून काही धागा मिळतो का? याची चाचपणी पोलीस करणार आहेत. (Pallavi Kaustubh Amte talks on Dr Sheetal Amte Karjagi Suicide)

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता?

2016 साली नवी कार्यकारिणी कोणालाही न जुमानता आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याचं सांगत आनंदवनातीलच दोन व्यक्तींनी नाराजी उघड केली. त्यानंतर डॉ. विकास आमटे यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या राजू सौसागडे यांनी नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणं सुरू ठेवलं. आनंदवनातील ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या राजू सौसागडे यांनी वादातून थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. नव्या व्यवस्थापनानं कार्यालयात बोलावून अपमान केला. सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्याचं सांगत सौसागडे यांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला. आनंदवनातील वाद आणि एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप याच घटनेपासून चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांचं कुटुंब 1973 मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाचं काम सुरू करत गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे स्थलांतरीत झाले. तेथे त्यांनी आदिवासींमधील गोंड, माडिया समाजातील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, शिक्षण आणि उपजीविका यासाठी अनेक उपक्रम सुरु केले.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि खासकरून विश्वस्तांवर आरोप ठेवले गेले होते. डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बेछुट आरोप केले. त्याच्या अर्ध्या तासातच डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी तो फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओ काढून टाकला. विशेष म्हणजे डॉ. शीतल यांच्या फेसबुक लाइव्हनंतर समाजात गैरसमज पसरू नये म्हणून आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले.

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवलं. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.

संबंधित बातम्या :

डॉ. शीतल आमटे आत्महत्या : मोबाईल, लॅपटॉपला Eye पासवर्ड; चौकशी करायची कशी?

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?

आमटे परिवारातील वाद ते विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, कोण होत्या शीतल आमटे?

(Pallavi Kaustubh Amte talks on Dr Sheetal Amte Karjagi Suicide)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.