AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो, हार, सत्कार, सेल्फी काही नको’, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

'हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो, हार, सत्कार, सेल्फी काही नको', पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
| Updated on: Dec 12, 2020 | 1:03 AM
Share

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. आज (11 डिसेंबर) त्यांनी जयंतीच्या प्रसादाच्या पॅकिंगच्या कामाची स्वतः पाहणी केली. या भेटीचे फोटो ट्विट करताना त्या म्हणाले, “कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भोजनाच्या पंक्ती वैगेरे करता आल्या नाहीत. यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो. हार, सत्कार, सेल्फी काही नाही, शुद्ध भावना आणि तुमची ऊर्जा हीच बस आहे (Pankaja Munde appeal supporter on Gopinath Munde Jayanti amid Corona).”

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना व्हिडीओ मेसेजद्वारे आवाहन करत रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचंही आवाहन केलं. त्या म्हणाल्या, “12 डिसेंबर हा आपल्या सर्वांना उर्जा देणारा दिवस आहे. गोपीनाथ मुंडे संघर्षाचं मुर्तीमंत मोठं उदाहरण होतं. आज ते आपल्यात नाही तरीही ते आपल्यासाठी संघर्षाचा महामेरु आहेत. लोकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारं ते नेतृत्व आहे. गोपीनाथ गडाच्या निर्मितीनंतर 12 डिसेंबर आणि 3 जून हे दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. या दिवशीच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांपासून मोठमोठे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील नेते उपस्थित राहिले. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे असे दोन्ही छत्रपती गोपीनाथ गडावर आले.”

‘दरवर्षीप्रमाणे होणारी मोठी सभा, मोठे नेते आणि गर्दी टाळा’

“दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम व्हावा अशी कार्यकर्त्यांसह माझीही इच्छा आहे. पण जागतिक स्तरावर साथीरोगाचा धोका आहे. महाराष्ट्रावर आणि सामान्य नागरिकांवर फार मोठं संकट आहे. त्यामुळेच कोरोनाचे नियम पाळून लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेत हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांची जयंती साजरी होणार आहे. पण दरवर्षीप्रमाणे मोठी सभा, मोठे नेते आणि गर्दी आपल्याला टाळायची आहे,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त सर्वांनी रक्तदानाचा कार्यक्रम घ्या’

“मी स्वतः सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहे. आपण सर्वांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहनासाठी गर्दी न करता यावं. यावर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी रक्तदानाचा कार्यक्रम घ्यावा. या महामारीच्या संकटाच्या काळात रक्तदानाची फार आवश्यकता आहे. त्याचा समाजाला फार मोठा उपयोग आहे. त्यामुळे 12 ते 15 डिसेंबरच्या काळात आपण सर्वांनी रक्तदान शिबिरच आयोजित करावे,” असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी समर्थकांना केलं.

हेही वाचा :

यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम नाही; कोरोनाचे नियम पाळून होणार दर्शन : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, ‘आयसोलेट’ झाल्याची ट्विटरवरुन दिली होती माहिती

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

Pankaja Munde appeal supporter on Gopinath Munde Jayanti amid Corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.