ज्या ट्रॅकवर उभं राहून पंकजा मुंडेंनी फोटो ट्विट केला तो कुठपर्यंत आला? बीड-नगर-परळी रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार?

ज्या ट्रॅकवर उभं राहून पंकजा मुंडेंनी फोटो ट्विट केला तो कुठपर्यंत आला? बीड-नगर-परळी रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार?

बहुप्रतिक्षित बीड-नगर-परळी रेल्वेमार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. स्वतः माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या रेल्वेमार्गाबाबत ट्विट केल्यानं या विषयावर राज्यभर चर्चा होत आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 11, 2021 | 9:10 PM

बीड : बहुप्रतिक्षित बीड-नगर-परळी रेल्वेमार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. स्वतः माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या रेल्वेमार्गाबाबत ट्विट केल्यानं या विषयावर राज्यभर चर्चा होत आहे. केंद्र सरकारने या रेल्वेमार्गासाठी 527 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच हा मार्ग पूर्ण होईल, अशी आशा पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीय. त्यांनी या रेल्वेमार्गावर उभा असलेला आपला फोटो देखील ट्विट केलाय. तसेच निधू मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले (Pankaja Munde comment on Beed Nagar Parali railway work and sanction fund by Modi Government).

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाचं अत्यंत कठिण स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. बीडच्या विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नांची आहुती दिलीय. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला जनसेवेचं व्रत दिलंय. ते काम आम्ही कधीही विसरणार नाही. या रेल्वे मार्गाला 527 कोटी रुपये मंजूर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पियुष गोयल यांचे धन्यवाद.”

केंद्राकडून 527 कोटी रुपयांची तरतूद

बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेला परळी बीड अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूसंपादनाचं काम सध्या रखडलंय. त्यामुळे या रेल्वेमार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी या रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्राने 527 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, राज्य सरकारने या कामासाठी अद्याप निधी जाहीर केला नसल्याचाही आरोप होतोय. तसेच बीडच्या रेल्वेचा प्रश्न कधी सुटणार असाही प्रश्न उपस्थि केला जातोय.

348 कोटींपैकी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी परळी बीड अहमदनगर रेल्वेमार्गासाठी ऑगस्ट 2020 मध्ये एक ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत निधी मिळावा असा पाठपुरावा करण्यात आला. यातील 348 कोटींपैकी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. रेल्वेमार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे आदेश देखील मुंडे यांनी संबंधित विभागांना दिले होते. केंद्राचा वाटा 50 टक्के आणि राज्याचा वाटा 50 टक्के असं या कामाचं सूत्रं ठरवण्यात आलाय. असं असताना देखील राज्य सरकारकडून 2020-21 या कालावधीत एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही. त्यामुळे भूसंपादन खोळंबल्याचा आरोप होतोय.

राज्य सरकारकडून रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधीची मागणी

केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये पुन्हा याच रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने तब्बल 527 कोटी 63 लाख 88 हजार रुपयांची तरतूद केली आहे. केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. राज्याकडून देखील रेल्वे मार्गाच्या कामातील वाटा यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. अद्याप हा निधी न आल्याने रेल्वेच्या या कामाला खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाचा इतिहास

261 किलोमीटरचा हा रेल्वमार्ग 1990 मध्ये मंजूर झालाय. काहीवेळा याचं उद्घाटनही झालं, मात्र त्याच्या कामाला गती येऊ शकली नाही. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत 2009 मध्ये प्रचारसभेत जाहीर केलं की पुढील निवडणुकीचा प्रचार मी या मार्गावरील रेल्वेने करेल. यावेळी हा रेल्वेमार्ग सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. त्यांनी निवडून आल्यानंतर त्या पंचवार्षिकमध्ये निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना केवळ 400 कोटी रुपयेच मिळवता आले.

2014 मध्ये केंद्रातील सत्तांतरानंतर या रेल्वे प्रकल्पावर थेट पंतप्रधान कार्यालयातून देखरेख सुरु झाली. मोदी सरकारकडून मार्च 2019 च्या आधी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जमीन अधिग्रहण न झाल्यानं हा प्रकल्प खोळंबला. यानंतर हा प्रकल्प सुरु करण्यासाठी नवी डेडलाईन मार्च 2020 निश्चित करण्यात आली. मात्र, या काळातही हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. आजही हा प्रकल्प काम सुरु असलेल्या स्थितीतच आहे.

हेही वाचा :

बीडच्या आरोग्य विभागातील आयुक्त, संचालकांसह 8 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

बीडचं राजकारण तापलं, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ

एक टन वजनाच्या हाराने धनंजय मुंडेंचं जन्मगावी स्वागत, मुंडेंच्या आईंना अश्रू अनावर

व्हिडीओ पाहा :

Pankaja Munde comment on Beed Nagar Parali railway work and sanction fund by Modi Government

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें