बीडचं राजकारण तापलं, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ

बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता प्रकरण चांगलंच भोवलं आहे.

बीडचं राजकारण तापलं, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ

बीड : बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता प्रकरण चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केलेल्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे (Beed collector take action against Mayor Bharatbhushan Kshirsagar).

याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबादच्या मुख्य अभियंत्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कारवाई होत असल्यामुळे बीडचे राजकारण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केलंय. दुसरीकडे या सर्व कारवाईनंतर नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी सदर कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप केलाय. तसेच आपण याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचंही सांगितलं. आम्ही विकास काम करत आहोत. हे विकास काम विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे असा खोडसाळपणा करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काका क्षीरसागर यांनी केलाय.

तक्रारदारावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा करणार

“चुकीचे कागदोपत्री दाखवून दिशाभूल करण्यात आलीय, त्यामुळे माझी आणि बीडच्या जनतेची बदनामी झाली आहे. म्हणून तक्रारदारावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे,” असं मत नगराध्यक्ष भरातभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा :

धनंजयना पंकजा म्हणाल्या विकासासाठी शुभेच्छा, तर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर

पंकजांसमोर धनंजय मुंडे म्हणाले, या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो!

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

व्हिडीओ पाहा :

Beed collector take action against Mayor Bharatbhushan Kshirsagar

Published On - 7:50 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI