AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणीत सभामंडप कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Parbhani Temple Accident : परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरात सभामंडपाचे छत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

परभणीत सभामंडप कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
temple hall slab collapse cctvImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 20, 2026 | 5:21 PM
Share

परभणीत आज मंदिराचे छत कोसळून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यशवाडी येथील हनुमान मंदिरात ही घटना घडली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचे छत अचानक कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू होऊन ठिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला आहे. ढिगारा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

हनुमान मंदिरात झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात काही भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक मंडप कोसळतो आणि ढिगाऱ्याखाली अनेक भाविक गाडले जातात. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्र्यांनी घेतली दखल

या भीषण दुर्घटनेची पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून आवश्यक मदतसाहित्य, क्रेन आणि बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या प्रशासनाचे प्रमुख लक्ष्य ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढणे हे असून संपूर्ण जिल्हा प्रशासन यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल