ढाण्या वाघाच्या सुटकेवेळी नगरमध्ये मुलाचा जन्म, नाव ठेवलं - 'अभिनंदन'

अहमदनगर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांचं शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजता भारतात जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या सुटकेवेळी देशभरात जल्लोष साजरा केला जात होता, तर याचवेळी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका मुलाचा जन्म झाला. शौर्यवान अभिनंदन यांच्या सुटकेमुळे भारावलेल्या या कुटुंबीयांनीही मुलाचं नाव अभिनंदन ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अभिनंदन यांच्यासारख्या शौर्यवान …

Top News of the Day, ढाण्या वाघाच्या सुटकेवेळी नगरमध्ये मुलाचा जन्म, नाव ठेवलं – ‘अभिनंदन’

अहमदनगर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांचं शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजता भारतात जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या सुटकेवेळी देशभरात जल्लोष साजरा केला जात होता, तर याचवेळी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका मुलाचा जन्म झाला. शौर्यवान अभिनंदन यांच्या सुटकेमुळे भारावलेल्या या कुटुंबीयांनीही मुलाचं नाव अभिनंदन ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

अभिनंदन यांच्यासारख्या शौर्यवान वीरपुत्राचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या आनंदात नगरमधील सूर्यवंशी कुटुंबीयांनीही मुलाचं नाव अभिनंदन ठेवलं. मुलाचा जन्म सायंकाळी सहा वाजता झाला. पण त्यावेळी अभिनंदन यांच्या सुटकेच्या बातम्या टीव्हीवर येत होत्या. प्रत्येकाला अभिनंदन यांच्या आगमनाची उत्सुकता होती. त्याच वेळी या चिमुकल्याचा जन्म झाला.

Top News of the Day, ढाण्या वाघाच्या सुटकेवेळी नगरमध्ये मुलाचा जन्म, नाव ठेवलं – ‘अभिनंदन’

एकीकडे अभिनंदन भारतात आल्याचा आनंद प्रत्येकाला होता. दवाखान्यातील देखील वातावरण आनंदमय होतं. अभिनंदन यांना परत भारतात आणल्याने त्या बाळाच्या आई-वडिलांनी आणि घरच्यांनी या आनंदाच्या क्षणी आपल्याही बाळाचं नाव अभिनंदन ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्या लहान बाळाचं नाव अभिनंदन असं ठेवलं. या सगळ्या घटनेचा आम्हा सगळ्यांना प्रचंड आनंद झालाय, या सगळ्या घटनेची आठवण राहावी म्हणून आम्ही आमच्या बाळाचं नाव अभिनंदन ठेवल्याचं चिमुकल्या अभिनंदनच्या आई प्रणिता सूर्यवंशी यांनी सांगितलं.

27 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूसेना आणि पाकिस्तानी वायूसेनेत संघर्ष झाला. पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हवाई सीमेत प्रवेश केला. पाकिस्तानची विमानं परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांचंही विमान कोसळलं. त्यांनी पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं. पण अभिनंदन यांनी स्वतःची सुटका करुन घेतली तेव्हा ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानने अटक केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *