Mumbai Rail Accident : दादर रेल्वे अपघातानंतर अजूनही लोकलचा खोळंबा, एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची मुभा

Mumbai Rail Accident : मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसचे तीन डबे घसरले होते. या अपघातामुळे रेल्वेचा प्रचंड खोळंबा झाला होता. ऐन कामावरून घरी जाण्याच्यावेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला होता.

Mumbai Rail Accident : दादर रेल्वे अपघातानंतर अजूनही लोकलचा खोळंबा, एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची मुभा
दादर रेल्वे अपघातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:26 AM

मुंबई: मध्य रेल्वेच्या (central railway) माटुंगा रेल्वे स्थानकावर (matunga station) एक्सप्रेसचे तीन डबे घसरले होते. या अपघातामुळे रेल्वेचा प्रचंड खोळंबा झाला होता. ऐन कामावरून घरी जाण्याच्यावेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला होता. लोकल वेळेत नसल्याने अनेकांना बस, एसटी आणि टॅक्सीचा आधार घेऊन घरी जावं लागलं होतं. काल रात्री हा अपघात झाल्यानंतर अजूनही रेल्वे सेवा पूर्ववत झालेली नाही. घसरलेल्या एक्सप्रेसचे दोन डबे रुळावर आणण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना (railway employees) यश आलं आहे. तर एक डब्बा रेल्वे रुळावर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्याचा लोकल सेवेवर अजूनही परिणाम झालेला आहे. अजूनही लोकल सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना एक्सप्रेस (लांब पल्ल्याच्या गाड्या) मधून प्रवास करण्यास मध्य रेल्वेने मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवासी आहे त्या पासवर किंवा तिकीटावर रेल्वेची पुढील सूचना येईपर्यंत एक्सप्रेसने प्रवास करू शकणार आहेत.

काल रात्री हा अपघात झाला. या रेल्वे अपघातामुळे मध्य रेल्वेची लोकल विस्कळीत झाली आहे. स्लो लोकल अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सुरू आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या फास्ट लोकल नऊ वाजेपर्यंत सुरू होणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकल दुपारपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मेल ट्रेन सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. लोकल प्रवाशी मेलमधूनही प्रवास करू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लहोटी यांनी दिली.

चाकरमान्यांची लटकंती

काल रात्री रेल्वेचा खोळंबा झाल्यानंतर चाकरमान्यांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. लांबच्या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांनी एसटीचा धावा करत एसटीने घरी जाणे पसंत केले. त्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरा घरी पोहोचावं लागलं. आधीच रात्री उशिरा घरी पोहोचलेल्या चाकरमान्यांनी नेहमीप्रमाणे लोकल सुरू होतील या आशेने सकाळीच स्टेशन गाठले. मात्र, सकाळीही लोकलचा खोळंबा झालेला पाहून चाकरमानी चांगलेच वैतागले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकलच्या प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला.

संबंधित बातम्या:

Train Accident: दादर स्टेशनबाहेर गदग-पद्दुचेरी एक्सप्रेसची धडक; एकाच रुळावरुन जात असल्याने अपघात

Dadar Train: रेल्वे क्रॉसिंगदरम्यान 2 एक्स्प्रेस एकमेकांवर आदळल्या, इंजिनचा भाग धडकून शॉर्टसर्किटनं खळबळ

Hanuman Jayanti: हनुमान जयंतीनिमित्त 1 हजार लाऊडस्पीकर देशभरातील मंदिरांना देणार- मोहित कंबोज

Non Stop LIVE Update
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.