सर्वात मोठी बातमी! अखेर अजित पवार-शरद पवार एकत्र, आता दोन्ही राष्ट्रवादी…अजितदादांची थेट घोषणा

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आज प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! अखेर अजित पवार-शरद पवार एकत्र, आता दोन्ही राष्ट्रवादी...अजितदादांची थेट घोषणा
ajit pawar and sharad pawar together
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 28, 2025 | 9:33 PM

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आज प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक फार उशिरा आली. कार्यकर्ता जपला पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे कारण आम्ही शिव- शाहू- फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करतो. मी खासदार झालो तेव्हा पी व्ही नरसिंगराव मंत्री होते. शेतकरी कुटुंबातील मी कार्यकर्ता. शरद पवार तेव्हा चांगलं काम करत होते. मला खासदार केल्यावर हा शहरात विकास झाला पाहिजे अस वाटायचं. अनेक ठिकाणाहून लोक इथे नोकरीला यायचे. लोक इथे राहायचे आणि मुक्कामाला पुण्यात जावं लगत होत. आता सुधारणा झाली आहे.

माझी केंद्रात ओळख आहे…

पिंपरी चिंचवड महापालिकेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेला ज्यांनी कर्जात ढकललं आहे त्यांना बाजूला करायच आहे. माझी केंद्रात ओळख आहे. प्रश्न सोडवता येईल. आपल्या विचारांचे काही खासदार आहे. त्यांच्याकडून काम करुन घायचं आहे. शेतकरी तुमची माझी जात आहे. दोन दिवस कळ काढा सगळं समजेल. भूलथपांना बळी पडू नका. काही लोकांची दहशत नेस्तनाबूत करायची आहे (महेश लांडगे ना उद्देशून) असंही अजित दादांनी म्हटलं आहे.

संत पीठ हे फक्त नावा पुरते राहिले आहे – अजित पवार

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, कुदळवाडीत जमीनी बळकावण्यात आल्या. संत पिठात वारकरी घडवायचे होते. मात्र तिथे CBSE स्कूल सुरू केली. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही. संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावा पुरते राहिले आहे. जे ठरलं होतं ते का थांबवण्यात आलं? वेगळ्या पद्धतीच राजकारण जे चालल ते थांबवायला हवं. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी कधी कर्ज काढलं नव्हतं. आज महापालिकेवर कर्ज झाला आहे. हे पाप कोणाच? टँकर माफिया शहरात चालत आहे. मुठभर लोकांना पोसण्यासाठी तुम्ही लोकांना पाणी देत नाही असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता महेश लांडगे यांना इशारा दिला आहे.