Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढ 'विदाऊट ब्रेक' सुरुच, दहा दिवसात पेट्रोल-डिझेल किती महाग?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. (Petrol Diesel Price Hike in Ten Days)

Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढ 'विदाऊट ब्रेक' सुरुच, दहा दिवसात पेट्रोल-डिझेल किती महाग?

मुंबई : देशभरात सलग दहा दिवस इंधन दरवाढ सुरुच असल्याने वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. आधीच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खिसा गरम झाला असताना पेट्रोल-डिझेलचे दर भडकत असल्याने सर्वसामान्य नागरिक कात्रीत सापडले आहेत. गेल्या दहा दिवसात पेट्रोल तब्बल साडेचार रुपयांनी महाग झाले आहे. (Petrol Diesel Price Hike in Ten Days)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. पेट्रोल आजच्या दिवसात प्रतिलिटर 47 पैसे, तर डिझेल 57 पैशांनी महाग झाले आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल एकूण 4 रुपये 50 पैशांनी, तर डिझेल एकूण 5 रुपये 66 पैशांनी महागले आहे.

अशी झाली दरवाढ

7 जून
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

8 जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

9 जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

10 जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07
(Petrol Diesel Price Hike in Ten Days)

11 जून
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

12 जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

13 जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

14 जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

15 जून
पेट्रोल 82.70
डिझेल 72.64

16 जून
पेट्रोल 83.17
डिझेल 73.21

लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे 16 मार्च ते 5 मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.

दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर 76.73 रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव 75.19 रुपयांवर पोहोचला आहे.

इंधनाच्या किमतीत उत्पादन शुल्क, स्थानिक कर, व्हॅट, अधिभार यांचा समावेश होती. त्यामुळे प्रत्यक्षात इंधनाचे दर ग्राहकांसाठी प्रचंड चढ्या प्रमाणात असतात. राज्य सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटवरील अधिभार म्हणून प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली होती.

हेही वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दरात आठवडाभर वाढ कायम, वाहनचालक त्रस्त

(Petrol Diesel Price Hike in Ten Days)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *