पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण, दहावीच्या विद्यार्थ्याकडून घरबसल्या चार चाकी गाडीची निर्मिती

मुक्ताईनगरमधील एका ग्रामीण भागातल्या मुलाने इलेक्ट्रीक बॅटरीच्या सहाय्याने चालणारी चार चाकी गाडी बनवली आहे. (student Produce four wheeler electric Car at Muktainagar)

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण, दहावीच्या विद्यार्थ्याकडून घरबसल्या चार चाकी गाडीची निर्मिती
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 7:05 AM

जळगाव (मुक्ताईनगर) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमधील एका ग्रामीण भागातल्या मुलाने इलेक्ट्रीक बॅटरीच्या सहाय्याने चालणारी चार चाकी गाडी बनवली आहे. अर्चन चिंतामण पाटील असे या 16 वर्षीय मुलाचे नाव आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे त्याने कल्पनाशक्तीच्या जोरावर या कारची निर्मिती केली आहे. (Petrol-Diesel Price Hike 10th standard student Produce four wheeler electric Car at Muktainagar)

लॉकडाऊन काळात घरबसल्या गाडीची निर्मिती

अर्चन हा मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावा राहतो. मुक्ताईनगर या ठिकाणी असलेल्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा तो विद्यार्थी आहे. अर्चनला लहानपणापासूनच गाडीचा फार शौक आहे. लॉकडाऊन काळात घरबसल्या त्यानेही गाडी तयार केली आहे. अर्चनच्या घरात असलेल्या सायकलवरुन त्याला ही कल्पना सुचली. त्याने तयार केलेल्या या गाडीत 24 व्हॉल्टची एक बॅटरी आहे. यासाठी त्याने 45 एंपिअरची बॅटरी त्याने वापरली असून ती साधारण ट्रॅक्टर किंवार कारसाठी वापरली जाते.

सायकलचे ब्रेक आणि दुचाकीच्या एक्सलेटरचा वापर

तर या कारसाठी लागणाऱ्या बॅटरी जोडणीचे ज्ञान त्याने घरीच यूट्यूबवरून घेतले. ही गाडी सायकलचे ब्रेक आणि मोटारसायकलचे एक्सलेटर वापरुन तयार करण्यात आली आहे. तसेच यात प्लायवूडचाही वापर करण्यात आला आहे. ही गाडी गिअरच्या सहाय्याने पुढे-मागे नेता येते. तसेच या गाडीचा वेग ताशी 20 कि.मी. प्रति तास इतका आहे. या गाडीसाठी त्याला जवळपास 30 हजार रुपये खर्च आला आहे.

सोलर पॉवर कार बनवण्याचे ध्येय

अर्चनला लहानपणापासूनच गाडी बनवण्याची आवड आहे. अर्चनचे वडील आरोग्य सेवक आहेत. ग्रामीण भागात राहणारा अर्चन हा शिक्षणासाठी रोज मुक्ताईनगरला ये-जा करतो.परंतु सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने घरीच आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याने घरातील वस्तूंपासून ही कार बनवली आहे. त्याची संशोधनाची आवड पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढे सोलर पॉवर कार बनवण्याचे अर्चनचे ध्येय आहे.

अर्चनला लहानपणापासून याप्रकारच्या विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याची आवड आहे. लहानपणी मुले जशी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकी बनवतात, त्याप्रमाणे अर्चन हा त्या वस्तू रिमोटच्या सहाय्याने बनवायचा. त्याने मोबाईलवर व्हॉईज कमांड देऊन एक रोबोटही तयार केला होता. विशेष म्हणजे त्याच्या या रोबोटला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले होते.

(Petrol-Diesel Price Hike 10th standard student Produce four wheeler electric Car at Muktainagar)

संबंधित बातम्या : 

मिरजेत नशेबाज तरुणांचा हैदोस सुरुच, ऑईल टँकरची काच फोडली, वाहकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात पनवेलमध्ये निदर्शने, रस्त्यातच चुलीवर बनविले जेवण

Know this : Paralysis Attack कधी येतो, त्याची लक्षणं काय?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.