PhonePe: आता फोनपे महाराष्ट्रातून बाहेर पडणार; जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांची टीका

फोन पे ने आपले मुंबई कार्यालय बेंगळुरूला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सत्ताधारी शिवसेना - भाजप सरकारला आणखी एक धक्का मानला जात आहे. फोन पे राज्यातून बाहेर कार्यालय स्थलांतरीत करण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही.

PhonePe: आता फोनपे महाराष्ट्रातून बाहेर पडणार; जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांची टीका
वनिता कांबळे

|

Sep 23, 2022 | 12:09 AM

मुंबई : वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकीय धुराळा उठला आहे. हा धुराळा अद्याप खाली बसला नसतानच फिनटेक अॅप फोन पे(PhonePe ) नेही महाराष्ट्रातून जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या गुरुवारच्या जाहीर सूचनेमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील फोन पे कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे या सूचनेमध्ये सांगण्यात आले आहे.

फोन पे ने आपले मुंबई कार्यालय बेंगळुरूला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सत्ताधारी शिवसेना – भाजप सरकारला आणखी एक धक्का मानला जात आहे. फोन पे राज्यातून बाहेर कार्यालय स्थलांतरीत करण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही.

डिजिटल पेमेंट मध्ये अग्रस्थानी असलेलं फोन पे अॅपचं मुंबईतील कार्यालयात बंगळुरात स्थलांतरित करण्यात येणारे असल्याची माहिती समोर आलेय. एका वृत्तपत्रात यासंदर्भातील माहिती छापून आली. जितेंद्र आव्हाड यांनीही फोन पेचं कार्यालय जाण्यावरुन सरकारला सवाल केला आहे.

आजच्या वर्तमानपत्रातील नोटीस जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली आहे. वेदांत/फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्यापाठोपाठ फोन पे चे मुख्य ऑफिस देखील कर्नाटकात जाण्याच्या वाटेवर..
काय चाललंय काय ?
महाराष्ट्रातली बेरोजगारी संपली कि काय ?
जाहिरातीत आक्षेप असल्यास नोंदवा असे जाहीर केले आहे
आक्षेप नोंदवा ….
असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

वेदांतानंतर फोन पेची बारी, गब्बर होत आहेत शेजारी

अशी टीका आमदार रोहित पवार यांची ट्विट करत केली आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें