AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Plane Crash : माझी पिंकी गेली… विमान अपघाताची बातमी ऐकताच आजीला धक्का, 2 महिन्यांपूर्वीच..

बुधवारी सकाळी बारामती येथील विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी 4 जणांचाही त्यात मृत्यू झाला. त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचा समावेश होता. तिच्या जाण्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिची आजी तर शोकाकूल आहे. अपघातापूर्वी 1 दिवस आधीच पिंकीचं वडिलांशी बोलणं झालं होतं. पिंकीची जीवनकथा संघर्ष, कठोर परिश्रम आणि योगायोगांनी भरलेली होती.

Baramati Plane Crash : माझी पिंकी गेली... विमान अपघाताची बातमी ऐकताच आजीला धक्का, 2 महिन्यांपूर्वीच..
बारामतीतील अपघताता पिंकीचा मुृत्यू, आजी शोकाकूल
| Updated on: Jan 29, 2026 | 11:45 AM
Share

बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निधन झाले. त्यांच्यासह आणखी 4चौघांचाही मृत्यू झाला. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील पिंकी माळीचाही समावेश होता.  फ्लाइट अटेंडंट पिंकी माली ही जौनपूरच्या केरकत तहसीलमधील भैंसा गावची रहिवासी होती. अपघाताची आणि तिच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिची आजी तर रडून रडून शोकाकूल झाली. एका वृत्तवाहिनिशी बोलताना त्यांनी मनातलं दुःख व्यक्त केलं. माझं माझ्या मुलाशी बोलणं झालं, त्याने सांगितलं की आमची लाडकी लेक, नात, पिंका आता या जगात नाही, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

पिंकीचे काका चंद्रभूषण माळी म्हणाले की, पिंकी खूप हुशार मुलगी होती. अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच ती घरी आली होती. पिंकी माळीचे शिक्षण मुंबईत झाले आहे, असे तिचे काका म्हणाले.

जौनपूरला घरी जायची पिंकी

अपना दलाचे राष्ट्रीय सचिव पप्पू माळी म्हणाले की, पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. पिंकीचे संपूर्ण कुटुंब मुंबईत राहत होतं, पण तरी तेवारंवार जौनपूरला येत असत. पाच-सहा वर्षांपूर्वी पिंकीचं लग्नही झालं होतं, असं त्यांनी सांगितलं.

मंगळवारीच फोनवर झालं बोलणं

पिंकीच्या वडिलांनी सांगितलं की, मंगळवारीच त्यांचं त्यांच्या मुलीशी फोनवर बोलणे केले. उद्या ( बुधवारी) मी अजित दादांसोबत बारामतीला जाणारे आणि तिथून नांदेडला जाणार आहे, असं तिने सांगितल्याचं वडिलांनी नमूद केलं. पण हे त्यांचं संभाषण शेवटचे ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले.

संघर्षाने भरलेला प्रवास

बारामती येथील विमान अपघातात जीव गमावलेल्या पिंकी माळीचं आयुष्य संघर्षमय होतं. तिचे वडील शिवकुमार माळी हे एकेकाळी दिल्ली विमानतळावर काम करायचे, परंतु तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या विमानात झालेल्या एका किरकोळ चुकीमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि नंतर शिवसेनेत (शिंदे गट) सामील झाले. वडिलांच्या सल्ल्याने आणि प्रेरणा घेऊन पिंकीने मॉडेलिंगचा पर्याय सोडून एव्हिएशन क्षेत्रात करिअर केलं. अपघाताच्या आदल्या दिवशी मंगळवारी रात्रीही, पिंकीने घरी फोन करून तिच्या प्रवासाची माहिती दिली. मात्र त्याच विमानाचा अपघात झाला आणि मुलगी गेली, ही बातमी कळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला.

लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल.
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला.
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला.
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद.