बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाजवळ राडा प्रकरण, ठाकरे गट विभागप्रमुख महेश सावंत यांची चौकशी

दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा झाला. 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क मैदानावर मोठा राडा झाला.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाजवळ राडा प्रकरण, ठाकरे गट विभागप्रमुख महेश सावंत यांची चौकशी
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 11:47 AM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 :  दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा झाला. 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिवस होता. मात्र त्याच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क मैदानावर मोठा राडा झाला. एकनाथ शिंदे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहून निघून गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमनेसामने आले. आता याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हा तपास सुरू केली असून त्याप्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. त्यानंतर सोमवारी सावंत यांची चौकशी करण्यात आली.

16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी शिवतीर्थावर जवळपास दोन ते तीन तास गोंधळ सुरु होता. दोन्ही गट आमने सामने आले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ हा प्रकार घडला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर पोलिसांनी या गोंधळाबद्दल चौकशी सुरू केली. घटनास्थळाच्या आसपास असलेले सीसीटीव्ही आणि तेथील रेकॉर्डिंग हे तपासून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. या राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही पाठवण्यात आली. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांनी आदेश दिले होते. पोलिसांनी आतापर्यंत 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांचीही चौकशी करण्यात आली. हा राडा झाला, त्यावेळी घटनास्थळी जे पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते, त्यांनीही रेकॉर्डिंग केले. त्याआधारेही गुन्हा नोंदवून अधिक तपास करण्यात येत आहेय

काय म्हणाले महेश सावंत ?

याप्रकरणी महेश सावंत यांचीही चौकशी झाली. मी दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो. मला स्टेटमेंटसाठी पोलिसांचा फोन येत होता . मला सांगितलं की दंगलीचे कलमलावले आहेत. पण दंगलीचे कलम असतील तर एका बाजूने दंगल होत नाही, असं मी त्यांना सांगितलं. पण त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही. पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली होती, दंगल घडवण्यासारखे गुन्हे आमच्यावर लावण्यात आले आहेत. जो राडा झाला, त्याबाबत माहिती देण्यासाठी आलो होतो. सध्या विभाग प्रमुख म्हणून मलाच नोटीस दिली आहे. याप्रकरणी अजून कोणी तक्रार केली नाही,पोलिसांनीच तक्रार दाखल केली आहे.

आम्ही 2013 सालापासून बैठक घेत आहोत, कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येतो. त्या दिवशी आम्हाला समजलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे येणार आहेत. त्याबद्दल आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगितले. आम्ही साडे तीनतास वेटिंगवर होतो, म्हणून आम्ही तिकडे गेलो. तेव्हा आमचे वरिष्ठ नेते माध्यमांशी बोलत होते. पण तेव्हाच उर्मट नरेश म्हस्के आले आणि ते तिथेच थांबून, अडून बसले. म्हणूनच हा राडा झाला. त्यामुळे आम्ही म्हस्के यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असे सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.