AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Murder Case : फोटोमधील आरोपी दिसून आल्यास… बीड पोलिसांचं पत्रक जारी; नाव गुप्त ठेवणार, बक्षिसाचीही घोषणा

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात फरार आरोपींना पकडण्यासाठी आता पोलिसांकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे. बक्षीसाचीही घोषणा करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : फोटोमधील आरोपी दिसून आल्यास... बीड पोलिसांचं पत्रक जारी; नाव गुप्त ठेवणार, बक्षिसाचीही घोषणा
| Updated on: Jan 02, 2025 | 5:29 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकारानं राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 23 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र तरी देखील या हत्याप्रकरणातील काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय 26, कृष्णा शामराव आंधळे वय 30 वर्ष, सुधीर ज्ञानोबा सांगळे वय 23 वर्ष हे अद्यापही फरार आहेत. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या तीन आरोपींची अटक झाल्यास पोलिसांच्या हाती या प्रकरणात महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता पोलिसांकडून या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे.  सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच बक्षीसही देण्यात येईल असं पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलं? 

पो. स्टे. केज ( जि. बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2), 140 (2), 126, 118 (1), 34 (4), 34(4), 324 (4) (5), 189(2), 190 भारतीय न्याय संहितामध्ये वरील छायाचित्रामध्ये दर्शविलेल्या प्रमाणे आरोपी निष्पन्न असून ते खुना सारखा गंभीर गुन्हा केल्यापासून फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे चालू आहेत. नागरिकांना अवाहन करण्यात येते की, वरील आरोपीतांचे ठाव ठिकाण्याची कोणास माहिती किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी खालील नमुद नंबरवर संपर्क साधून आरोपीची माहिती कळवावी, माहिती देणाराचे नाव अत्यंत गोपनिय ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षिस देण्यात येईल. असं या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात वाल्मिकी कराडवर देखील आरोप करण्यात येत होते. तो देखील फरार होता. मात्र घटनेच्या 22 व्या दिवशी तो पुण्यात सीआयडीला शरण आला. या हत्याकांडातील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे, तर काही आरोपी अजूनही फरार आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?