AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठाण्याचे मसीहा’ पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला का आले नाहीत? अंबादास दानवेंचा शिंदेंवर नाव न घेता निशाणा, म्हणाले- मनात पाप…

Ambadas Danve On Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंबादास दानवे आक्रमक झाले आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत.

'ठाण्याचे मसीहा' पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला का आले नाहीत? अंबादास दानवेंचा शिंदेंवर नाव न घेता निशाणा, म्हणाले- मनात पाप...
| Updated on: Oct 06, 2026 | 6:59 PM
Share

प्रदीप पुर्णेकरांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी भेट घेतली आहे. अंबादास दानवेंसोबत माजी खासदार राजन विचारेही उपस्थितीत होते. यानंतर अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आमच्या उपशहर प्रमुख्याचा कार्यालयाचीही रेकी करण्यात आली. तपासअधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? आम्ही पुर्णेकर कुटुंबासह लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहोत, असं यावेळी अंबादास दानवेंनी सांगितलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींचे सीडीआर पुर्णपणे काढण्याची आवश्यकता आहे. ज्या लोकांनी कृत्य केलेलं आहे, त्यांचे सीडीआर काढा. महापालिकेनं एका आरोपीचं घर पाडलं होतं. त्यांच्या नातेवाईकांची आणखी मस्ती वाढलेली आहे. लोकशाहीचा हा महाराष्ट्र असणार आहे. जनता रस्त्यावर उतरेल आणि मस्ती जिरवेल. पोलिसांची वागणूक संशयास्पद पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे स्वत:ला मसीहा समजणारे कुठे गेले? एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांचा मुडदा पाडला तेव्हा इकडे का नाही आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, मनात पाप आहे म्हणून हिंमत होत नाही आहे. आमच्याकडे सुद्धा पुरावे आणि सीसीटीव्ही आहेत. तपास यंत्रणेंनी तपास व्यवस्थित न केल्यास ते पुरावे आम्ही न्यायलयात सादर करू. आम्ही उच्च न्यायालयात पुरावे सादर करणार आहोत. जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आहे. आम्ही न्यायालयात हे पुरावे घेऊन जाणार आहोत. प्रदीप पूर्णेकरांसह जनतेसाठी रात्र दिवस झटत होते. टाळूवरचं लोणी खाणाऱ्या लोकांना ते नको होते. आरोपींना फासावर चढवलं पाहिजे. चांगला अधिकारी तपास 24 तासात तपास होईल. यासाठी निष्पक्ष आधिकारी नेमायला पाहिजे आहेत. मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यायला हवा आहे.

अंबादास दानवेंनी सांगितले की, सरकारने SIT स्थापन केली तरी या लोकांची मस्ती गेली नाही. प्रदीप पुर्णेकर यांच्यासोबत असणारे पदाधिकारी संतोष शिर्के यांच्या कार्यालयात जाऊन रेखी केल्याच्या व्हिडिओ आहे. कुणाच्या पाठिंब्याने मस्ती केली जाते. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. गृहखाते त्यांच्याकडे आहे. त्यांच्या खात्यात काय चालू आहे त्यांना माहिती आहे का? आमचे संपर्क झाले आहे लवकरच भेटू. तपास यंत्रणांना आमचे पदाधिकारी भेटले. अनेक CCTV आहेत.

ते पुढे म्हणाले की, ज्यांचे नाव FIR मध्ये घेतले आहे त्यांचे CDR तपासावे. संभाजीनगर येथे एकाचे घर पाडून टाकले होते. इथे पण JCB आणावा. पोलिसांची वागणूक संशयास्पद आहे. व्हिडिओ करणारे कुठे गेले आनंद दिघेंचे पाईक कुठे गेले? एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांचा गोळ्या झाडून हत्या केली आता कुठे गेले हे? न्याय देण्याचा पर्यंत आम्ही करू. त्यांच्या सोबत अजून कुणाचा हाताचा प्रयत्न होत का हेही बघू. तपास योग्य व्हावा. फास्ट ट्रॅकवर केस चालवावी. आरोपींना फाशी द्यावी. चांगल्या अधिकाऱ्यांनी तपास केला तर २४ तास लागणार नाही. निष्पक्ष अधिकारी नेमावा मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. त्यांनी जर न्याय दिला नाही तर आमच्याकडे वेगळे दरवाजे आहेत, असा थेट इशाराच अंबादास दानवेंनी दिला आहे.

Follow Us
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!